Maharashtra

?जळगांव Live… Big Breaking…विशेष निर्बंधां सह दि 28 मार्च ते 30 मार्च पर्यंत जळगांव जिल्ह्यात लॉक डाऊन..!

?जळगांव Live… Big Breaking…विशेष निर्बंधां सह दि 28 मार्च ते 30 मार्च पर्यंत जळगांव जिल्ह्यात लॉक डाऊन..!

जळगांव कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे.
जळगांव जिल्ह्यात दिनांक 28 मार्च, 2021 रोजी – होळी व दिनांक 29 मार्च, 2021 रोजी धुलीलीवंदन हे सण साजरा करण्यात येणार असून सदर सणानिमित्त मोठया प्रमाणावर नागरिक एकत्र येण्याची शक्यता असल्याने कोविङ-19 विषाणूच्या संसर्गात / प्रादुर्भावात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही
आणि जळगाव जिल्हयात कोविड-19 बाधित / संशयीत रुग्ण संख्येत दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाढ होत असल्याने उक्त नमूद करणांच्या कालावधीत नागरिकांमध्ये होणारी वर्दळ / गर्दी नियंत्रित करण्यासाठी व कोविङ19 विषाणूच्या संसर्गात प्रादुर्भावात होणारी वाढ रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा भाग म्हणून जळगांव जिल्ह्यात कडक निर्बन्ध लागू करणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने जळगांव जिल्हयात दिनांक 28 मार्च, 2021 रोजी रात्री 00.01 वाजेपासून दिनांक 30 मार्च, 2021 रोजी रात्री 24.00 बाजे पावेतो फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 सह विशेष निर्बन्ध खालील प्रमाणे लागू
करीत आहे.
1) सर्व बाजारपेटा, आठवडी बाजार बंद राहतील.
2) किराणा दुकाने, Nan-kssential इतर सर्व दुकाने बंद राहतील.
किरकोळ भाजीपाला /फजे खरेदी-विक्री केंद्र बंद राहतील.
4) शैक्षणिक संस्था/शाळा/महाविद्यालय, खाजगी कार्यालये बंद राहतील.
5) हॉटेल / रेस्टॉरंट सेवा बंद राहतील. तथापि केवट होम डिलीव्हरी, पार्सल सेवा सकाळी 09.00 ते रात्री 09.00 वाजेपर्यंत सुरू राहतील.
6) सभा/ मेळाये/बेठका / धार्मिक स्थळे, सांस्कृतिक/धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील,
7) शॉपग मॉल / मार्केट, बायर शॉप, स्या, सलून, लिकर शॉप बंद राहतील.
8) गार्डन, पार्क, बगीचे सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव प्रेक्षकगृहे, क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील.
9) पानटपरी, हातगाड्या, खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बंद राहतील.
10) खाजगी प्रवासी वाहतूक (अत्यावश्यक सेवा वगाजून) बंद राहतील.11) दुध विक्री केंद्र केवळ सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 वाजेपावेतो सुरु राहतील.
12) कायद्याव्दारे बंधनकारक असणान्या पूर्व नियोजित वैधानिक सभा Online पध्दतीने घेता येतील.
13) कोविड-19 लसीकरण कार्यक्रम सुरु राहील.
14) औद्योगिक आस्थापना सुरु राहतील, तथापि संबंधितांनी ओळखपत्र बाळगणे अनिवार्य राहील.
15) होळी व धुलीवंदन निमित कोणत्याही प्रकारे सामुहीक / सार्वजनिक कार्यक्रम साजरा करण्यास सक्त मनाई राहील.
वरील प्रमाणे लागू करण्यात आलेल्या निबंधातून वैद्यकीय उपचार व सेवा, मेडीकल स्टोअर्स, अॅम्ब्युलन्स सेवा व इतर अनुषंगिक अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटक यांना सुट राहील,
तसेच सदर कालावधीत पूर्व नियोजित परिक्षा असल्यास परिक्षार्थी व परिक्षेकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांना वर नमूद केलेल्या निबंधातून सुट राहील.
वरील प्रमाणे जळगांव जिलयात लागू करण्यात आलेल्या निबंधांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तिकरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे तरतुदीनुसार
शिक्षेस पात्र राहील.अमळनेर शहरात उद्या पासून 2 दिवस लॉक डाऊन आणि 1 दिवस जनता कर्फ्यु असे 3 दिवस बंद करण्यात आले होते. पण आता जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार 4 दिवस अमळनेर बंद राहील.या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्याशी बोलल्या नंतर समर्पक उत्तर मिळाले नाही. व नंतर त्यांचा भ्रमणध्वनी बंद येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button