Amalner

प्रहार च्या लढ्याला यश sadm प्रणाली पुन्हा सुरू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली योगेश पवार यांच्या तक्रारीची दखल

प्रहार च्या लढ्याला यश sadm प्रणाली पुन्हा सुरू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली योगेश पवार यांच्या तक्रारीची दखल

प्रतिनिधी: रजनीकांत पाटील

कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तीवर ग्रामपंचायत, पंचायत समिती , जिल्हा परिषद ,व नगरपरिषद ,महानगरपालिका ५% निधी योजनेच्या लाभासाठी दिव्यांग बांधवांचे दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी करणे शक्य होत नसल्याने योजनेचा लाभ देता येत नसल्याने दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली असतांना जळगांव जिल्ह्यातील अमळनेर चे प्रहार अपंग क्रांती संस्था चे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना www.sadm.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ बंद असल्याबाबत लेखी खुलासा मागितले असतांना आज दि.26 सप्टेंबर 2020 रोजी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन sadm प्रणाली चालू करण्यात आली महाराष्ट्रातील लाखो दिव्यांग व्यक्तींचे दाखले पडताळणी करणे शक्य झाल्याने लाभ मिळणे देखील सोपे झाले आहे. मा.ना.बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेचे अमळनेर शहराध्यक्ष योगेश पवार यांचे सर्व दिव्यांग बांधवांकडून आभार व कौतुक केले जात असून दिव्यांगांसाठी अशीच कामे नेहमी करत राहावे असे शहरातील दिव्यांग व्यक्तींकडून भावना व्यक्त होत आहे.१४ सप्टेंबर २०१८ रोजी शासन निर्णय काढण्यात आली की नवीन २१ प्रकारचे दिव्यांग समाविष्ट करण्यात आल्यामुळे sadm प्रणाली वरून नवीन दाखले देण्यात येऊ नये व www.swavlambancard.gov.in या संकेत स्थळावरून नवीन दाखले देण्यात यावे. परंतु अद्यापही काही दिव्यांग बांधवांचे (UDID)युनिक कार्ड आले नसल्याने लाभापासून वंचित राहू असे असतांना महाराष्ट्र शासनाने घेतल्या निर्णयाचे योगेश पवार यांनी मनापासून आभार मानले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button