Amalner

⭕महत्वाचे..शरीरात ऑक्सिजन कमी होत असेल तर दुर्लक्ष करू नका…

⭕महत्वाचे..शरीरात ऑक्सिजन कमी होत असेल तर दुर्लक्ष करू नका…

अमळनेर विनोद जाधव

आपल्या शरीराला कमी ऑक्सिजन मिळाल्याने दुर्लक्ष करू नका. हि लक्षणे देतात पूर्वसूचना आणि ऑक्सिजन कसा वाढवायचा. माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन आवश्यकता असते. मात्र शरीरा मध्ये किती प्रमाणात ऑक्सिजन ची गरज असते. मागील काही दिवसापासून संपुर्ण जग कोविड 19 शी झगडत आहे. कोरोना आलेवर संपुर्ण जगाला ऑकसिजन चे महत्व पटले किंवा समजले. कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्यामुळे शरीरात किती ऑकसिजन आहे किंवा आपल्याला जिवंत रहायला लागतं अस समजले. आता सर्वत्र महापालिका, नगरपालिका, यांचे कर्म चारी , शहरात ग्रामीण भागात जाऊन ऑकसिजन किंवा इमुनिटी ची शक्ती किती आहे असे तपासणी करत आहे. हे लक्षन कसे ओळखायचे आणि मात्र कोरोना व्यतिरिक्त असे अनेक रोग आहेत ज्या द्वारे रक्ताची पातळी कमी होते.हायपोकसिचा जेव्हा शरीरातील अंतर्गत अवयवाना पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. तेव्हा आजार होण्याची शक्यता असते. अनेक लोकांना ऑक्सिजन नाही मिळाल्यावर श्वासचा त्रास होतो. आणि रक्तपुरवठा नीट होत नाही. पल्स ,ऑकसिमिटर चा यंत्रांद्वारे हि क्रिया नीट चालते का हे तपासले जाऊ शकते . हायपोकसियाची लक्षणे या आजारामुळे श्वास कोंडल्याा सारखे वाटते या कडे लक्ष न दिल्यास हळूहळू त्रास वाढत जातो. श्वास घ्यायला त्रास झाल्यानंतर रक्तातील ऑक्सिजन ची मात्रा कमी होते. शरीराचे अवयवांना प्राणवायुचा अत्यावश्यक असते. आपल्या शरीरात कमीत कमी 95% पेक्षा अधिक ऑक्सिजन उत्तम असते. आरोग्य साठी मात्र 90% पेक्षा कमी ऑकसिजन राहीले तर शरीराला घातक ठरू शकते. काही वेळेस रुग्ण दगावण्याची शक्यता असते. ऑक्सिजन मात्र डाॅ कृत्रिम ऑक्सिजन देवुन वाढु शकतो. आपल्या घराच्या शेजारी हे करुन पहा. मनी प्लाट,सनेक प्लांट ,जरबेरा या सारखे झाडांची लागवड केलेने नैसर्गिक ऑक्सिजन मिळु शकतो. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी जास्तीत जास्त चालने किंवा हळूहळू धावणे या मुळे शरीरातील अवयवांना पेशींना ऑक्सिजन मात्र जास्त प्रमाणात मिळतो .सदृढ शरीर ठेवण्यासाठी हिरवे पाले भाजी पोषण युक्त आहार घ्या. दिवसात भरपूर पाणी घ्या मिठाचा कमी वापर करा उच्च रक्तदाब कमी होतो.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button