Amalner

?️अमळनेर कट्टा…होय …… आजपासून राजकारण पूर्ण बंद !फक्त आणि फक्त समाजसेवा !समाजसेवक मनोज शिंगाणे

?️अमळनेर कट्टा…होय …… आजपासून राजकारण पूर्ण बंद !फक्त आणि फक्त समाजसेवा !समाजसेवक मनोज शिंगाणे

मला समाजसेवेत आवड आहे म्हणून मी त्या कार्यात जीव ओतला परंतु यातून राजकीय व्यक्तींशी संपर्क आला जवळीक वाढली आणि हळूहळू मी राजकारणात गुरफटला गेलो, यातून माझ्याकडून काहींच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे सामाजिक सेवेला राजकीय रंग चढू पाहत होता. म्हणून मी यातुन बाहेर येऊ पाहत आहे. मला कुणाला दुखवायचे नाही मला फक्त इतरांना आनंद वाटेल अशी सेवा करायची आहे. त्यासाठी माझं संपूर्ण जीवन आयुष्य समाजसेवेसाठी लावेल निस्वार्थ रुग्ण सेवा आरोग्याबाबतीत रक्तदानासाठी सदैव तत्पर असेल ८०० वर रुग्णांना रक्तदानाचा माध्यमातून मदत झालेली आहे. हे सगळ झाल फक्त आणि फक्त युवा बांधवांमुळे मला मला प्रोत्साहन देणारे पत्रकार,डाॕक्टर्स,शिक्षक,अधिकारी,महिला वर्ग समाजातील सगळ्याच घटकांमुळे मला खूप प्रेरणा मिळत गेली खरच मला अभिमान आहे एवढ छान कार्य आपल्या अमळनेर नगरीत होत असल्याचा आज अनिता बडगुजर या महिलेस B+ प्लास्माची आवश्यकता होती हे कळताच संध्याकाळी ७-०० वाजे पासुन ते १-०० वाजे पर्यंत आपली ओ पी डी बंद ठेऊन बालरोग तज्ञ डाॕ. कमलेश पाटील (आनंद बाल रुग्णालय) व संदीप घोरपडे सरांचे चिरंजीव अनिकेत घोरपडे हे धुळे येथे अर्पण रक्तपेढीत रक्तदान करायला तयार झाले समाजात एक चांगला संदेश जायला हवा म्हणून घोरपडे सर म्हणाले आमच्या घरात ३ कोरोणा प्लाझ्मा दान करायला तयार आहेत. यावेळी मनोज शिंगाणे व दिनेश तेवर यांनी देखील रक्तदान केले. कोरोना मुळे परिस्थिती खूप वाईट झालेली आहे प्लास्मा दान करायला स्वतः हुन पुढे यायला हवे दान करणाऱ्या वजन ६० किलो असायला हव कोरोणा झाल्या नंतर २८ दिवसानंतर ते १२० दिवसाचा आत प्लास्मा दान करायला हवा जीव वाचवायचे असतील तर व्हॕक्सीन घ्यायचा आधी रक्तदान प्लास्मा दान करा हि विनंती ५ तासात आपल्या शरिरात तयार होतो व पंधरा पंधरा दिवसांनी दान करता येतो.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button