Maharashtra

प्रथम गांवोगांवचे मंदिर खुली करा

प्रथम गांवोगांवचे मंदिर खुली करा* , ह.भ.प.शंकरराव कोल्हे यांची मागणी,

नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे

यांजकडून नाशिक-:कोवीङ जागतिक महामारी संकटामुळे सर्व थरातील लोक आथिॅक अडचणीत आले आहे वारकरी संप्रदाय, वेठबिगार, असंघटीत,कलाकार, अपवाद नाही. मुदुंगाचार्य गायक,वादक,व भालदार चोपदार आज त्यांची आथिॅक अडचणीत कोंडी झाली आहे सार्वजनिक उत्सव हरीनाम सप्ताह व इतर कार्यक्रम सुरु करण्याची मागणी ह.भ.प.शंकरराव कोल्हे यांच्या सह अण्णा साहेब आहेरयानी केली आहे जनसामान्यांच्या भावनेचा आदर करुन मंदिरे खुली करुन त्यातील धार्मिक वातावरणाची उर्जा घेऊन अस्वस्थ व सैरभैर वातावरणास शांत व आनंददायी करण्यासाठी मंदिरातील उपासना व नित्यनेम,सप्ताह कार्यक्रम किर्तने शासन अटीने पन्नास भाविकात सुरु करण्यास काहीच हरकत नाही, कारण उत्पन्नाचे स्तोत म्हणून सर्व व्यावहार सुरु होतात, मग वारकरी तर समंजस व भावनिक आहे.त्यांच्यावरच अन्याय का?म्हणून सर्वच व्यावहार जर सुरळीत चालु आहे तर मग वारकरी धार्मिक कार्यक्रम ही सुरु व्हावे. *हभपश्री.शंकरराव कोल्हे,खेडेकर* सदश्य- प्रदेश कमिटी अखिल भारतीय वारकरी मंडळ

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button