Akola

? Big Breaking…त्या पोलीस पाटलाचा अपघात कि खून! बेशीस्त वाहन चालकामुळे एका निरापराध पोलीस पाटलाचा जीव गेला आहे.

त्या पोलीस पाटलाचा अपघात कि खून! बेशीस्त वाहन चालकामुळे एका निरापराध पोलीस पाटलाचा जीव गेला आहे.

अकोले प्रतिनिधी विठ्ठल खाडे

दि १६ : अकोले तालुक्यातील राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड साहेब यांच्या बंगल्यासमोर एक संशयास्पद अपघात झाला आहे. तो अपघात आपण पाहिल्यानंतर तो खरोखर अपघात आहे की, खून! असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही. त्यात एका बेशीस्त वाहन चालकामुळे एका निरापराध पोलीस पाटलाचा जीव गेला आहे.
हा संपुर्ण प्रकार माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या बंगल्याच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. साहेबांनी सहकार्य करीत तो व्हिडिओ पोलिसांना दिला असता घडला प्रकार समोर आला आहे.

मात्र हे प्रकरण दडपण्यासाठी नातेवाईकांवर दबाव आणला जात असल्याचे समजते तर वाहनचालक कोण याबाबतही उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे .
याबाबत राजूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, बाभूळवंडी तालुका अकोले येथील पोलीस पाटील धोंडिबा मंगा करवर वय ५५व ढवळा बहिरू लेंडे वय ४५ हे दोघे आपली मोटार सायकल एम एच ०४ सीएक्स ६१०७ घेऊन राजूरकडे येत असताना आरोपी चालक विकास चंद्रकांत चोथवे रा . राजूर हा आपली ताब्यातील पिकअप गाडी एम एच ०४डीएस ९६६१ घेऊन विरुद्ध दिशेने रस्त्याकडे दुर्लक्ष्य करून भरधाव वेगाने येऊन मोटरसायकलला उडवून दिले त्यात पोलीस पाटील धोंडिबा मंगा करवर याचा जागीच मृत्यू झाला तर मागील सीटवर बसलेला ढवळा बहिरू लेंडे यास गंभीर दुखापत झाली असून मृत्यूस जखमीस कारणीभूत ठरल्याने राजूर पोलिसांनी आरोपीविरोधात भा द वि कलम ३०४(अ ), २७९,३३७ , ३३८ ,४२७मोटारवाहन कायदा कलाम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सपोनि नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉ . कैलास शेळके तपास करीत आहे मात्र घटना सोमवारी घडूनही बुधवारी सकाळपासून पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली तर एका राजकीय नेत्याचा पोलिसांना फोन झाल्याची चर्चा त्यामुळे हे प्रकरण वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button