Jalana

दुचाकी व ट्रकची समोरासमोर धडक कामगार तरुणाचा जागीच मृत्यू

दुचाकी व ट्रकची समोरासमोर धडक कामगार तरुणाचा जागीच मृत्यू

संजय कोल्हे

अंबड : तालुक्यातील रामनगर शिवारात जालना- बीड हायवेवर ट्रकने दुचाकीस्वारास समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सोमवार (दि. ०४) रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त असे की, झिरपी येथील अमोल शिवलाल शिनगारे वय २८ वर्षे हा नित्यनियमाने गीतांजली हॉटेलमध्ये काळ्या स्प्लेन्डर मोटर सायकल क्र. एम.एच.२२ जी.४३०३ वरून कामास जात असताना जालना-बीड हायवेवर भरधाव वेगाने बिडकडे जाणाऱ्या ट्रॅक क्र. टी.एन.२८ बी.ई.३६९५ ने झिरपीहुन अंबड येथे हॉटेलवर काम करण्यासाठी जाणाऱ्या कामगार तरुणाला समोरासमोर धडक दिली. हा अपघात जोराचा असल्याकारणाने आजूबाजूला असलेल्या लोकांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली.
या भीषण अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव अमोल शिवलाल शिनगारे आहे. ट्रक जालना- बीड हायवेवरून बिडकडे भरधाव वेगाने जात असताना झिरपीहुन अंबडच्या दिशेने स्प्लेन्डर गाडीने अमोल शिनगारे दुचाकीवरून जात असतांनी दुचाकीला ट्रकने समोरासमोर धडक दिल्याने कामगार तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुग्रीव चाटे,पोलीस हेड कॉन्स्टेबल डी.एन.राऊत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. मृतास शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. अमोल शिवलाल शिनगारे या तरुणाच्या पश्चात पत्नी १ मुलगा २ मुली,भाऊ,भावजयी तसेच आई वडील असून घरातील प्रमुख कर्ता पुरुष गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button