Yawal

न्हावीच्या एका तरुणास तीन तलवारींसह अटक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली कारवाई..सर्वत्र एकच खळबळ..!

न्हावीच्या एका तरुणास तीन तलवारींसह अटक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली कारवाई..सर्वत्र एकच खळबळ..!

यावल प्रतिनिधी:अमित एस तडवी

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तलवारी बाळगणा-या तरुणास न्हावी तालुका यावल या गावातून जेरबंद केले आहे. केतन मधुकर पाटील असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सदरची ही कारवाई दिनांक १२ फेब्रुवारी रोजी शनिवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान करण्यात आली आहे .
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने भुसावळ जवळील यावल तालुक्यातील अकलूद या गावा जवळील एका हॉटेल जवळून गावठी कट्टा हस्तगत करण्यात यश मिळवले असता , त्यानंतर न्हावी गावातुन एका तरुणाकडे या तलवारी मिळून आल्याची कारवाई करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे .

न्हावी गावातील वाणीवाडा भागातील रहिवासी केतन मधुकर पाटील याच्या कब्जातून पंधरा हजार रुपये किमतीच्या तीन तलवारी पोलीसांकडुन हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदरचा तरूण हा तलवारीच्या धाकावर तो गावात व परिसरत दहशत माजवत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी हे. कॉ. महेश महाजन, अक्रम शेख, याकुब शेख, चालक विजय चौधरी यांना पुढील कारवाईकामी रवाना केले. पथकाने केतन पाटील याचा शोध घेतल्यावर नंतर तो मिळवून आल्यावर त्यास तलवारीसह ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गावातून जेरबंद केले आहे. केतन मधुकर पाटील असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांना समजली होती. केतन पाटील यास पुढील कारवाईसाठी त्याला फैजपुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर अखेगावकर व कॉन्स्टेबल राजेश बराटे हे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button