Motha Waghoda

मोठा वाघोद्या जवळ मोटारसायकल ओमनी चे समोरासमोर धडक मोटारसायकलस्वार गंभीर जखमी

मोठा वाघोद्या जवळ मोटारसायकल ओमनी चे समोरासमोर धडक
मोटारसायकलस्वार गंभीर जखमी

108 रुग्णवाहिके साठी तासाभरापर्यंत जखमी ची तळमळ.स्वर्गवासी रूग्णसेवा गोटू सेठ सुपे यांची आली आठवण

प्रतिनिधी /मुबारक तडवी मोठा वाघोदा ता. रावेर /अंकलेश्वर ब्रहानपूर महामार्गावर मोठे वाघोदे गावानजीक अपघाती वळणावर भडगाव येणाऱ्या भरधाव येणाऱ्या मोटारसायकल XCD क्र एम एच. 14बीपी 9406 व मारुती ओमनी कार एम एच 19 Ax 7512 ची समोरासमोर धडक होऊन मोटारसायकलस्वार समाधान उखर्डु वाघोदे रा.मोरगांव.ता.रावेर हे गंभीर जखमी झाले धडक इतकी जोरदार होती कि मोटारसायकल चा पुढील भाग चुराडा झाला त्यासोबत मारुती ओमनी चाही आरश्या सहित पुढील भागाचा चुराडा झाला.

मोठा वाघोद्या जवळ मोटारसायकल ओमनी चे समोरासमोर धडक मोटारसायकलस्वार गंभीर जखमी

घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेला कॉल करून कळविले मात्र रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू न शकल्याने लोकसेवक माजी आमदार हरिभाऊ जावळे यांनी लोकार्पण केलेल्या रुग्णवाहिकेतून जखमींला खाजगी दवाखान्यात उपचारार्थ रवाना करण्यात आले.
रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने रुग्णसेवक गोटू शेठ सुपे यांची आली सर्वांना आठवण

अंकलेश्वर बऱ्हाणपूर मार्गावर सावता वाघोदा ते वाघोदा वडगाव विवरा रावेर रस्त्यावर केव्हाही कुठेही अपघात होत असे तर मोठे वाघोदा येथील स्वर्गवासी काशिनाथ वसंतराव सुपे उर्फ गोटू सेठ हे आपका अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेची वाट न बघता त्यांच्या खाजगी वाहनातून उपचारार्थ दवाखान्यात दाखल करीत असत मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झाल्याने आज गावाजवळच भयंकर अपघात झाला व जखमी उपचारार्थ दवाखान्यात नेण्यासाठी वाहन आभावी तडफडत असतांनाच रुग्णसेवक काशिनाथ उर्फ गोटू शेठ यांची आठवण घटनास्थळावर उपस्थितांच्या मनाला चटका लावून गेली व असा रुग्णसेवक या जन्मी मिळणे दुर्मिळ असल्याचेही अनेकांनी बोलून दाखविले.

मोठा वाघोदा ते सुकी नदी पर्यंत रावेर महामार्गावरील दोन अपघात गाठी वळणांवर दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे मोठमोठे वाढल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ

मोठा वाघोदा ते सुखी नदी दरम्यान दोन किमी अंतरात दोन अपघाती वळण आहेत याच वळणांच्या दोन्ही बाजूने काटेरी झुडपे आठ ते दहा फूट उंच वाढलेले असून वाहनधारकांना वाहन चालवीत असताना समोरील वाहन दिसत नसल्याने अचानक वाहन समोर येऊन वाहनावरील अति वेगाचा ताबा सुटून सतत लहान-मोठे अपघात घडत आहेततरी सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षात घेऊन अपघाती वळणावरील हे काटेरी झाडे झुडपे तोडून साईट पट्ट्या मोकळ्या कराव्यात अशी मागणी वाहन धारकातुन होत आहे.

सावदा पोलिस स्टेशनचे कर्मचारी व मोठा वाघोदा ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली व घटनास्थळी पंचनामा केला अद्याप गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button