?️ अमळनेर कट्टा… बालमोहन विद्यालयात पहिल्या दिवशी विद्यार्थी प्रतिसाद चांगला..
अमळनेर : आज दिनांक 27 जानेवारी 2021 रोजी शासन परीपत्रकान्वये इयत्ता 5 वी ते 8 वी च्या शाळा चालू झाल्या. विद्यालयाची प्रत्येक खोली,कार्यालय,संगणक कक्ष,प्रयोगशाळा हॉल तसेच संपूर्ण परिसर निर्जंतुक करण्यात आला होता. सॅनिटाइजर तसेच हात धुवायला साबणाची व्यवस्था केलेली होती.
पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व एक पुस्तक भेट देवून स्वागत करण्यात आले.त्यावेळी अमर संस्थेचे व्यवस्थापक मुकेश चौधरी, मुख्याध्यापक प्रदीप चौधरी,शिक्षक बंधु,भगिनी उपस्थित होते. शिक्षकांनी प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव घेतला ,वातावरण आनंदी दिसले.सोशल डिस्टनसिंगचे पालन करत,मास्क लावून विद्यार्थी, शिक्षक हजर होते.विद्यार्थी प्रतिसाद चांगला होता.