Amalner

?️अमळनेर कट्टा.. तालुक्यातील 67 ग्राम पंचायतीत 77.77%मतदान..एकूण 53094 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क..सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार.. निवडणूक अधिकारी मिलिंदकुमार वाघ

?️अमळनेर कट्टा.. ग्राम पंचायत ब्रेकिंग….तालुक्यातील 67 ग्राम पंचायतीत 77.77%मतदान..एकूण 53094 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क..सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार.. निवडणूक अधिकारी मिलिंदकुमार वाघ

अमळनेर येथील 67 ग्राम पंचायतींच्या मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण २१३ प्रभागातील ५४३ पैकी २२२ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 321 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यात पुरुष 27769, स्त्री 25325 असे एकूण 53094 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.एकूण मतदान 77.77% एव्हढे झाले असून संपुर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली.

कोणताही अनुचित प्रकार झाला नाही, मशीन वै तांत्रिक अडचण न येता मतदान पार पडली.कोणत्याही कर्मचाऱ्यांना त्रास झाला नाही..कुणीही गैरहजर राहील नाही.सर्वांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनाने ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. यात उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे,महसूल कर्मचारी, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे आणि पोलीस कर्मचारी, उपविभागीय अधिकारी राकेश जाधव आणि कर्मचारी, मारवड पोलीस सहा पोलीस निरीक्षक राजेंद्र फुला आणि कर्मचारी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,जिल्हा परिषद शिक्षक,खाजगी शिक्षक,नगरपरिषद इ चे सहकार्य लाभले. सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, तलाठी, कोतवाल इ चे सहकार्य लाभले आहे असे निवडणूक अधिकारी मिलिंदकुमार वाघ यांनी मानले आहेत.

80% कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत नवीन होते पहिल्यांदा कार्य केले याचा मला अभिमान आहे. कोणीही चूक केली नाही. आत्मविश्वास निर्माण झाला.तरीही कुठे ही गोंधळ न होता खुश झाले आहेत.असे अभिमानास्पद उद्गागार निवडणूक अधिकारी मिलिंदकुमार वाघ यांनी काढले.

निवडणूक कामांची भीती दूर झाली आहे अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

कोव्हिडं 19 च्या पार्श्वभूमीवर अत्यन्त उत्कृष्ट नियोजन ,व्यवस्थापन, उत्तम प्रशासकीय यंत्रणा राबवून निवडणूक अधिकारी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी कार्यकुशलतेने,प्रेमाने,संयमाने, कार्यकुशलतेने एक उत्तम कप्तान म्हणून निवडणूकीची ही 2021 ची मॅच जिंकली आहे असेच म्हणावे लागेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button