Motha Waghoda

जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास सरपंच होऊ शकतात पायउतार?

जिल्हाधिकारी यांनी घेतली तक्रारीची दखल मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्या प्रकरणी सरपंच यांना नोटीस

ग्रामपंचायत सदस्य मुबारक तडवी यांनी केली होती लेखी तक्रार १९जून ला होणार सुनावणी

जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास सरपंच होऊ शकतात पायउतार?

प्रतिनिधी मुबारक तडवी

मोठा वाघोदा तालुका रावेर येथील ग्रामपंचायतीच्या दि ०७/१०/२०१७ ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी श्री.मुकेश रामदास तावडे हे लोकनियुक्त सरपंच पदासाठी निवडणूक निवडून आले होते त्यावेळेस त्यांनी करारनामा (शपथपत्र) लिहून दिलेल्या पत्रात सहा महिन्यात अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रमाणपत्र पडताळणी करून सादर करण्याचे हमीपत्र लिहून दिले होते व त्यांनी त्यांची जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कामी २१/०९/२०१७ या दिनांकाची अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती नंदुरबार यांचे नावाची ऑनलाईन कागदपत्रे भरलेली पोहच पावती (आवश्यक कागदपत्रांची फाईल अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती नंदुरबार या कार्यालयास जमा न करता) नामनिर्देशन भरतीवेळी दाखल केली होती मात्र जून २०२० आज पावेतो त्यांनी जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक विभागाकडे सादर केलेले नाही त्यामुळे त्यांना सरपंच पदावर राहण्याचा काही एक अधिकार नाही महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतीत अनुसुचित जमातीच्या राखीव जागेवर निवडून आलेल्या सदस्यांना विहित मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असूनही सरपंच तावडे यांनी 2 वर्ष 5 महिने इतका कालावधी होऊनही जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही त्यामुळे त्यांना सरपंच पदावर राहण्याचा काही एक अधिकार नाही अशी लेखी तक्रार मोठा वाघोदा बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य श्री.मुबारक अली तडवी यांनी दिनांक २०/०१/२०२० रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली होती त्या अनुषंगाने दिनांक ०६/०३/२०२० तक्रारीचा चौकशी अहवाल तहसीलदार रावेर यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला होता याकामी महाशय जिल्हाधिकारी जळगाव यांनी यांचेकडील पत्र ग्रामपंचायत विभाग जा.क्र.२९/२०२० पत्रकान्वये दिनांक १०/०६/२०२० च्या नोटीस अन्वये प्रस्तुत कानी तक्रारदार श्री मुबारक अली तडवी व लोकनियुक्त सरपंच श्री.मुकेश रामदास तावडे यांना दिनांक १९/०६/२०२० रोजी सकाळी ११ वाजता मा. जिल्हाधिकारी जळगाव यांचे दालनात सुनावणी निश्चित करण्यात आलेली आहे तरी लोकनियुक्त सरपंच यांनी आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यासह हजर रहावे.

वरील दिवशी व वेळी हजर न राहिल्यास आपले याकामी आपले काही एक म्हणणे नाही असे गृहीत धरून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही या नोटिशीत म्हटले आहे सदर सुनावणी दरम्यान लोकनियुक्त सरपंच यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास मा. जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button