Dindori

ना. नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नांतून बस स्थानकाना ३५ कोटी रुपये

ना. नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नांतून बस स्थानकाना ३५ कोटी रुपये

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधीं

दिंडोरी – दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघाचे आ. तथा दिंडोरी विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ ,आमदार नितीन पवार,एन. डी.गावित यांच्या प्रयत्नांतून दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा,धडगाव बसस्थानकाला आदिवासी उप योजनेतून ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामुळे आदिवासी भागातील बसस्थानकांना झळकी मिळणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भाग असलेल्या पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी बसस्थानकांची प्रचंड दुरवस्था होती. पेठ बसस्थानकातही इमारत मोडकळीस आली होती. दिंडोरी शहरातही बसस्थानकाची दुरवस्था झाली होती. सुरगाण्यात तर बसस्थानक होते की नव्हते अशी परिस्थती होती. सुरगाणा आणि पेठ बसस्थानकामध्ये प्रचंड पाणी तुंबून राहायचे. पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरलेले दिसायचे. कळवण, सुरगाणा, पेठ, दिंडोरी या चारही बसस्थानकांमध्ये शौचालयांची दुरावस्था होती. या सर्व पार्श्वभूमीवर ना. नरहरी झिरवाळ यांनी राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली व आर्थिक तरतूदीविषयी चर्चा केली. त्यानंतर त्यानुसार चारही बसस्थानकांसाठी निधी मंजूर करून घेतला. त्यात दिंडोरी बसस्थानकासाठी १० कोटी रुपये मंजूर झाले आहे. पेठ बसस्थानकासाठी ८.६७ कोटी रुपये, सुरगाणा बसस्थानकासाठी ४.१७ कोटी रुपये, कळवण बसस्थानकासाठी ५.९५ कोटी,धडगाव बस स्थानक साठी ४.२१ कोटी रुपये मंजूर झाले आहे. या कामी आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. आदिवासी विकास योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात एस. टी. डेपोचा विकास बांधकाम, दुरुस्ती या योजनेअंतर्गत वित्त विभागाने मान्यता दिल्यानुसार सन २०२२-२३ च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पिय तरतुदीमधून ३५ कोटी रुपये वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ना. नरहरी झिरवाळ यांचे पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण तालुक्यातील जनतेने आभार मानले आहे.

चौकट
सुदाम्याचे पोहे
इतिहासात आदिवासी विकास विभागाकडून ३५ कोटी रुपये मंजूर झाल्याची घटना पहिली असून या मंजुरील नामदार नरहरी झिरवाळ यांनी पोहे सुदाम्याचे अशी मिश्किल टिपण्णी केली आहे. दिंडोरी पेठ मतदार संघात नामदार नरहरी झिरवाळ यांनी अनेकदा आदिवासी जनतेचे हाल पाहिले होते.अनेकदा नाशिक ,दिंडोरी, पेठ येथे मोठ्या रुग्णालयात रुग्णांना पाठीवर नेताना आणताना अनेक लोक दिसले तसेच अनेक प्रसिध्दी माध्यमांनीही अशी दृश्य छापली होती.एस टी बस हे आदिवासी भागातील प्रमुख दैन दीन जीवनातील घटक आहे हे नरहरी झिरवाळ यांनी जाणले होते.त्यामुळे एस टी बस स्थानक सुधारले पाहिजे या उद्देशाने त्यांनी मागील सरकारच्या काळात आदिवासी वीकास विभाग यांच्याकडे बस स्थानक दुरुस्ती व नुतनी कारण करण्याचा प्रस्ताव मांडला होता.राज्य परिवहन महामंडळाकडे आर्थिक परिस्थिती नसल्याने व बस स्थानक दुरुस्ती साठी त्यांच्याकडे तरतूद नसल्याने आदिवासी विकास विभाग कडे नामदार नरहरी झिरवाळ यांनी पाठ पुरावा केला.एस टी.चे अधिकारी व आदिवासी विकास विभाग मंत्री ,अधिकारी यांच्या बैठका मध्येही झिरवाळ यांनी बस स्थानक दुरुस्ती किती महत्वाची आहे हे पटउन सांगितले.बस स्थानकात आदिवासी भागातील व्यक्ती आली तर त्याला येथे निवारा मिळतो.जर आदिवासी भागातील एखादा रुग्ण असेल तर त्याला नाशिक येथे जाण्यासाठी खाजगी वाहन परवडत नाही.तसेच एक रुग्ण काळी पिवळी गाडीत न्यायचा म्हटलं तर रुग्णाला तीन सिटांची जागा लागेल इतकी पैसे कीव भाडे मोजावे लागतात.तेच एस टी ने प्रवास सोपा होतो.बस जर सरळ स्थानकातील शेड मध्ये गेली तर आजारी व्यक्तीचा त्रास थांबू शकतो.त्याच प्रमाणे आदिवासी भागातील मुले,मुली पावसाळ्यात शाळेत जाताना येताना भिजतात.त्यांना शाळा सुटल्यावर ही गळक्या शेड मध्ये भीजलेले राहावे लागत असे.ते हाल होऊ नये यासाठी पेठ दिंडोरी बस स्थानक सुधारणे गरजेचे आहे ही बाब ही झिरवाळ यांच्या निदर्शनास आली होती .
त्यामुळे आदिवासी भागातील बस स्थानक सुधारले पाहिजे ही भूमिका नरहरी झिरवाळ यांनी मांडून त्याचा पाठ पुरावा केला होता.त्यानुसार मागील काळात प्रस्ताव पूर्तता करून निधी उपलब्ध होऊ शकला नाही.मात्र यंदा झिरवाळ यांनी मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करून निधी उपलब्ध केला. कळवनचे आमदार नितीन पवार व एन डी गावित यांनीही अनुक्रमे कळवन ,सुरगाणा बस स्थानक दुरुस्तीचे प्रस्ताव दिले.त्यास ही मंजुरी मिळाली आहे.मंजुरी मिळाल्या नंतर या मंजुरीस सुदाम्याचे पोहे अशी उपमा नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button