Pune

9 दुचाकी चोरांसह 20 दुचाकी ताब्यात…

9 दुचाकी चोरांसह 20 दुचाकी ताब्यात…

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे:इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील १५ व बाहेरील ५ चोरीला गेलेल्या मोटरसायकली चा छडा लावण्यास इंदापूर पोलिस यांना यश आले आहे. गोडसे सर्व मोटरसायकली हस्तगत करून ३ अल्पवयीन मुलांसह इतर ६ आरोपी ना ताब्यात घेतले आहे.

जप्त केलेल्या मोटरसायकली मालकांनी तक्रार दिलेली असेल तसेच मोटार सायकल ची कागदपत्रे घेऊन इंदापूर पोलीस स्टेशनची संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी केले आहे.

या वेळी बोलताना पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे म्हणाले की यासाठी एक खास मोहीम राबवून गुप्तमाहिती च्या आधारे मोटर सायकली चोरीचा छडा लावला आहे. यामध्ये आम्हाला पंढरपूर पोलिसांचे सहकार्य लाभल्याचे ही गोडसे यांनी सांगितले.

दरोड्याचा प्रयत्न करत असलेली टोळी आढळून आली यामध्ये राजू मोहन चव्हाण, अनिल अंकुश काळे (वेळापूर) निखिल पोपट लोंढे (माळशिरस) तिघेजण तसेच या मध्ये ३अल्पवयीन आरोपी आढळून आले असून अशा सहा लोकांची टोळी सापडली. महेश कांतीलाल नवले (माढा), सिद्धार्थ उर्फ अमोल मुसळे (माढा) सदाशिव महादेव फडतरे (पंढरपूर) असे तिघे असे एकूण नऊ आरोपी मिळाली आहेत.

सदर कारवाई पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनवे, पोलीस उप निरीक्षक माने, धोत्रे , देठे , पोलीस नाईक मड्डी , मोहिते ,चौधर, पो कॉन्स्टेबल वाघमारे,पोलीस हवालदार वाघमारे, सहाय्यक फौजदार रासकर , पोलीस मित्र अनिल शेवाळे, महादा गोरवे. आदीनी केली

संबंधित लेख

Back to top button