Faijpur

फैजपूर येथील सौ रत्नमाला ईश्वर इंगळे यांचा प्रामाणिकपणा वीस हजाराचे मोबाईल केले परत

फैजपूर येथील सौ रत्नमाला ईश्वर इंगळे यांचा प्रामाणिकपणा वीस हजाराचे मोबाईल केले परत

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : नीतिमत्ता जगात आजही शिल्लक आहे त्याचे उदाहरण आज फैजपूर शहरात पाहायला मिळाले फैजपूर तालुका यावल येथील शिव काॅलनी रहिवासी.तुषार रावते ह.मु मुंबई कल्याण.हे फैजपुर येथे आले असता त्यांचा रेडमी कंपनी चा सुमारे किंमत (20000) विस हजार रुपये चा मोबाईल भुसावळ रोडने हरवला.
तो मोबाईल आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष मा.ईश्वरभाऊ इंगळे यांची पत्नी सौ.रत्नमाला इंगळे यांना रात्री शतपावली करतांना सापडला.सापलेल्या मोबाईल वर काॅल येताच त्यांनी काॅल उचलला आणि सांगितले हा मोबाईल आम्हाला भुसावळ रोडने सापडला आहे काळजी करु नका येऊन तुमचा मोबाईल घेऊन जा.क्षणाचा ही विलंब न करता विनायक रावते आणि तुषार रावते मा.ईश्वरभाऊ इंगळे यांच्या घरी आले.ईश्वर भाऊ इंगळे व त्यांच्या पत्नी सौ.रत्नमाला इंगळे यांनी मोबाइलला त्यांच्या स्वाधीन केला रावते परिवाराने इंगळे परीवारचे कोटी कोटी आभार मानले..आणि हरवलेला मोबाईल घेऊन गेले इंगळे परिवाराचे या प्रामाणिकपणामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button