Delhi

? Breaking.. कर्ज बुडव्या विजय मल्ल्यावर ईडी ची मोठी कारवाई

? Breaking.. कर्ज बुडव्या विजय मल्ल्यावर ईडी ची मोठी कारवाई

नवी दिल्ली : बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय माल्ल्याची फ्रान्समधील 1.6 मिलियन युरोची म्हणजेच 14 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने ही कारवाई केली आहे.

मालमत्ता जप्त केल्यानंतर ईडीने या संदर्भात त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती दिली आहे. ईडीने याबाबत सांगितलं की, विजय माल्ल्याची फ्रान्समधील 14 कोटींची मालमत्ता मनी लाँन्ड्रिंग कायद्यांतर्गत जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, जानेवारी 2019 मध्ये विजय माल्ल्याला मनी लाँन्ड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत न्यायालयाने ‘फरारी आरोपी’ घोषित केले होते.
मार्च 2019 पासून तो लंडनममध्ये राहत आहे. भारत सरकार विजय माल्ल्याच्या प्रत्यर्पणासाठी प्रयत्न करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button