Amalner

? Big Breaking…अमळनेर येथील मंडळ अधिकारी यांचा वाढदिवस साजरा करतात आमदारांचे डावे उजवे हस्तक…!कुठे मुरतंय महसूल च पाणी…!

? Big Breaking…अमळनेर येथील मंडळ अधिकारी यांचा वाढदिवस साजरा करतात…आमदारांचे डावे उजवे हस्तक…!कुठे मुरतंय महसूल च पाणी…!अमळनेर येथील महसूल विभागावर कोणाचा वरदहस्त..!कोणाच्या इशाऱ्यावर नाचतो महसूल विभाग..!

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर येथील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कोणाचा वरदहस्त आहे अशी चर्चा संपूर्ण गावात सुरू आहे.नुकताच अमळनेर येथील नांदगाव मंडळ चे मंडळअधिकारी पी एस पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्याचे फोटो उपलब्ध झाले आहेत. या फोटो मध्ये अमळनेर चे आमदार अनिल भाईदास पाटील यांचे डावे उजवे हस्तक वाढदिवस साजरा करताना दिसून येत आहेत. या फोटो तील लोकांचे सरळ संबंध रेती,मुरूम,खडी क्रेशर इ गौण खनिज संपत्ती शी आहेत.आता पर्यंत अनेक कार्यवाही महसूल विभागाने अवैध गौण खनिज संदर्भात केल्या आहेत. परंतु जी मंडळी सदर फोटोत दिसून येत आहेत किंवा आमदारांच्या संबधित व्यक्तीं वर कार्यवाही झालेली नसल्याचे बोलले जात आहे.

सदर मंडळ अधिकारी हे गेल्या सात आठ वर्षांपासून अमळनेर येथेच आहेत.आधी ते गलवाडे येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. तर आता मंडळ अधिकारी म्हणून नन्दगाव येथे कार्यरत आहेत.

विशेष म्हणजे ते गलवाडे येथे कार्यरत असताना साने गुरुजी स्मारकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा करण्यात आला होता.तर आता नन्दगाव जवळ देखील एक गौण खनिज उपसा मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या करण्यात आला आहे.एक कर्मचारी 3 वर्षा पेक्षा एका गावात कार्यरत असणे नियमबाह्य आहे तरी ही सदर मंडळ अधिकारी यांची बदली गेल्या 7 वर्षांपासून झालेली नाही. आता या सर्व गोष्टींमागे कोणाचा वरद हस्त आहे..! असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

आता एका मंडळ अधिकाऱ्याचा वाढदिवस आमदारांचे खास माणसे तेही गौण खनिज शी संबंधित असलेले…!साजरा करतात..यावरून सुज्ञ विचार करत आहेत आणि महसूल विभाग कोणाच्या इशाऱ्यावर नाचतो हे ही जनता पाहत आहे..!बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर निवडणुकीत ताशेरे ओढणारे भूमीपुत्रच भूमीच वस्त्र हरण करत आहेत..!अशी चर्चा गावात सुरू आहे. स्वतः चे स्टोन क्रशर चालविणारे आमदार साहेब बेकायदेशीर धंद्याची भाषा करतात.. ! मंडळ अधिकारी चा वाढदिवस साजरा करण्यासाठी डावे उजवे कार्यकर्ते जातात..! कुठे पाणी मुरतंय रे बाबांनो…! महसूल विभाग जास्त पाणी मुरवू नका ..! पूर येईल बरं..! आणि पुरात आहे ते नष्ट करण्याची जोरदार क्षमता असते…! अर्थात हे जनतेने तुम्हाला सांगणं म्हणजे ..! बापरे…! कठीणच विषय होऊन जाईल..! ना ..!ये पब्लिक है ये सब जानती..!

? Big Breaking...अमळनेर येथील मंडळ अधिकारी यांचा वाढदिवस साजरा करतात आमदारांचे डावे उजवे हस्तक...!कुठे मुरतंय महसूल च पाणी...!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button