Amalner

?️अमळनेर कट्टा..मारवड हद्दीत पोलिसांची सट्टा आणि जुगाराच्या अड्ड्यावर धाड…

?️अमळनेर कट्टा..मारवड हद्दीत पोलिसांची सट्टा आणि जुगाराच्या अड्ड्यावर धाड…

अमळनेर तालुक्यातील मारवड व बोरगाव या गावांमध्ये मारवड पोलिसांनी सट्ट्याच्या अड्ड्यावर कारवाई करत चार जणांविरुद्ध गुन्हाची नोंद करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, स.पो. नि. राहुल फुला यांच्या निर्देशानुसार मारवड व बोरगाव येथे सदर कारवाई पो. ना. मुकेश साळुंखे व पो.हे. कॉ. बागवान यांनी मारवड येथील सेंट्रल बँकेच्या मागे सुरू असलेल्या सट्ट्याच्या अड्ड्यावर कारवाई केली . यात रतन पारधी, संतोष पारधी, सुनील जगदाळे याच्यावर कारवाई करून आरोपीकडून ६०५०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

येथून जवळच असलेल्या बोरगाव येथे भिल्ल वस्तीत सट्टा घेणाऱ्या दगा रामसिंग भील यास रंगेहाथ पकडुन ३३७०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पो. ना. मुकेश साळुंखे यांच्या फिर्यादीवरून सदर चार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७, १२ अ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो. कॉ. बाळकृष्ण शिंदे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button