Amalner

अमळनेर च्या तीन मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू…

अमळनेर च्या तीन मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू…

नूरखान

अमळनेर शिर्डी हुन मोटारसायकल ने परततांना पहाटे झालेल्या भीषण अपघात अमळनेर च्या २ युवकांचा १५ जून ला आधीच मृत्यू झाला होता त्यातील गंभिर जखमी असलेला प्रितम गुलाब ठाकूर याचाही आज धामणगाव, इगतपुरी येथील दवाखान्यात उपचार घेत असतानाच मृत्यू झाला.
भाऊ हर्षल ठाकूर याला घ्यायला शिर्डी येथे १४ जूनला मोटारसायकल ने प्रितम व सोबत गेलेले युवक मित्र विकास ईशी आणि गणेश चौधरी हे रात्री परतत असतांना १५ जून ला पहाटे १ च्या सुमारास ट्रक ने दिलेल्या धडकेत विकासचा जागीच मृत्यू झाला.मालेगांव येथील रुग्णालयात गंभीर जखमी असलेले गणेश आणि प्रितम यांना दाखल करण्यात आले होते तेथे गणेश ला मृत घोषित केले गेले तर प्रितम यास सिग्मा हॉस्पिटलमध्ये भाऊ हर्षल याने पुढील उपचारासाठी दाखल केले होते.प्रितम व हर्षल यांना आई वडील नव्हते,वृद्ध आजी सोबत ते रहात होते.

समाज पाठीशी उभा राहिला मात्र……

अनाथ प्रितम मालेगांव येथे सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल होताच अमळनेरहुन सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे ,दिलीप ठाकूर,नथु वानखेडे यांनी मालेगांव येथील समाज बांधवांना कळविले आर्थिक मदतही केली.मालेगांव येथील अध्यक्ष बापू वाघ ,पंकज सोनवणे,दिलीप भामरे आदिंनी धाव घेत हर्षलला सर्वोतोपरी मदत केली. समाजातून प्रितम व हर्षल च्या खात्यावर समाजबांधवांनी मदत गोळा केली.प्रितम चा हात, पाय,यासह मेंदूस गंभीर दुखापत झाली होती.गरिबीमुळे उपचारासाठी आर्थिक अडचण लक्षात घेऊन समाजाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ठाकूर यांनी त्यास स्वतःच्या धुळे येथिल सिद्धेश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले .२० जून पर्यंत उपचार केले मात्र गुप्तांग आणि किडणीलाही गंभीर इजा झालेली असल्याने त्यास पुढील उपचारासाठी समाजाचे कार्यकर्ते नाना बागुल ,नितीन ठाकूर,मुकेश ठाकूर यांच्या मदतीने इगतपुरी धामणगाव येथील एस एम बी टी रुग्णालयात काल रवाना करण्यात आले होते .तेथे नाशिक येथील समाजाचे कार्यकर्ते दिपक चव्हाण,मधुकर चव्हाण,पंडित चव्हाण आणि सर्व धावपळ केली अमळनेर च्या मूळ रहिवासी असलेल्या डॉ स्वरूपराणी देवरे ,बंडू पवार यांनीही प्रितम साठी सहकार्याचा हात दिला.मात्र मात्र आज सकाळी प्रितम याचे निधन झाल्याचे लहान भाऊ हर्षल याने अमळनेर येथे सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांना कळविले.प्रितम ला वाचविण्यासाठी गेले ६ दिवस चाललेला भाऊ हर्षल व समाजाचा,मित्रपरिवाराचा संघर्ष आज थांबला आहे.
बालाजी पुरा येथील रहिवासी असलेला प्रितम गुलाब ठाकूर वय २८, याच्या पश्चात १ भाऊ ,१ बहीण व वृद्ध आजी असा परिवार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button