Amalner

? दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण…ही उक्ती नगरपरिषद च्या अधिकारी,कर्मचारी,लोक प्रतिनिधी यांना तंतोतंत लागू….

दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण…ही उक्ती नगरपरिषद च्या अधिकारी, कर्मचारी,लोकप्रतिनिधी यांना तंतोतंत लागू….

अमळनेर

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर,सामाजिक आणि वैद्यकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक नियम आणि अटी दिलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी अत्यन्त मेहनतीने दिवस रात्र उपाययोजना करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार देखील आपआपल्या स्तरावर प्रयत्न शील आहेत.असे असताना स्थानिक स्वराज्य संस्था मात्र याबाबतीत उदासीन आहेत.अमळनेर येथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तर 22 तारखे नंतर आठ दिवसांनी मुख्यालयात कार्यरत होताना आढळून आल्या.यासंदर्भातील बातमी देखीलठोस प्रहार ने प्रसिद्ध केली होती.

आता तर अशी परिस्थिती आहे की येथील नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचारी एकाच ठिकाणी गर्दी करून उभे राहतात,तोंडाला मास्क किंवा मुक्स लावत नाही.सोशल डिस्टन्स चा कुठेही पत्ता नाही. एकूणच काय तर सर्व शहरातील सामान्य नागरिकांना कायद्याचा बडगा दाखविणारे,सामान्य माणसाच्या मनात भीती निर्माण करणारे नगरपरिषदेचे अधिकारी ,कर्मचारी स्वतःच नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत.

अद्याप पर्यंत लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील या एकदाही जनते पर्यंत पोहचल्या नाहीत.त्यांचे प्रीतिनिधी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील मात्र स्वतःच नगराध्यक्ष असल्या प्रमाणे वावरत आहेत. लोकांना प्रश्न उपस्थित झाला आहे की त्यांनी लोकनियुक्त म्हणून महिला ओबीसी राखीव पदावर लोकनियुक्त पुष्पलता पाटील यांना निवडून दिले आहे की माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांना? लोक वाट पाहत आहेत की ज्यांना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था अमळनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पदी निवडुन दिले त्या कुठे आहेत? त्या अमळनेर जनतेच्या अत्यन्त महत्वपुर्ण काळात का जनतेपर्यंत पोहचत नाहीत.असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button