पंढरपूर

महाराष्ट्राचा गोरगरीब शेतकरी आणि नागरिक जगला तरच तो उघड्या डोळ्याने येणारं सरकार पाहू शकेल

महाराष्ट्राचा गोरगरीब शेतकरी आणि नागरिक जगला तरच तो उघड्या डोळ्याने येणारं सरकार पाहू शकेल

पंढरपूर (प्रतिनिधी) : रफिक अत्तार

राष्ट्रपती राजवटीचा मोठा फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना बसला आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे मंत्रालयातील ७ व्या मजल्यावरील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाला सध्या टाळे लावण्यात आले आहे
त्यामुळं ५ हजार ६५७ रुग्णांचा जीव सध्या टांगणीला लागला आहे
मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षा टाळे लागल्याने आज हजारो रुग्ण या मदतीपासून वंचित आहेत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून मदत मिळण्यासाठी राज्यातील काना कोपऱ्यातून या ठिकाणी येत होते. गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या कक्षातून तब्बल २१ लाख रुग्णांना १६०० कोटीहून अधिक निधी मिळाला आहे
मात्र विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यापासून या कक्षाचे काम रेंगाळले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या सुचनेनंतरही निवडणुकीच्या काळात कक्षाचे काम झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यापासून तर कक्षाचे काम पूर्णपणे थांबवण्यात आले आहे
त्यामुळं मदतीच्या अपेक्षेत असलेल्या 5 हजारपेक्षा अधिक रुग्णांचे आयुष्य सध्या अधांतरी असल्याचे दिसून येत आहे.या प्रकारानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होऊ लागला आहे शिवबुध्द संघटना यावर आक्रमक भूमिका घेतली असून हा कक्ष पुन्हा सुरु करण्याची मागणी शिवबुध्दचे संदिपराजे मुटकुळे यांनी केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीमुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ च्या माध्यमातून गंभीर आणि अतिदक्षता विभागातील रुग्णांना सरकार कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून थेट मदत होते.परंतु ती मदत आज थांबलेली आहे.संपूर्ण महाराष्ट्रातून पुण्यातील सर्व हॉस्पिटलमध्ये हजारोंच्या संख्येने रुग्ण येत आहेत त्यांना मदत मिळाली पाहिजे असं मुटकुळे यांनी म्हटलं आहे.रुग्ण जगला पाहिजे, त्याला सरकारकडून हॉस्पिटल पर्यंत थेट मदत मिळाली पाहिजे
म्हणून सध्याच्या राजवटीच्या काळात तात्पुरते ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’चे नाव बदलून ‘राज्यपाल सहाय्यता निधी’ असे करा*ल
तात्काळ नाव बदलून तात्काळ सरसकट सगळ्या हजारो गरीब रुग्णांना थेट मदत मिळाली पाहिजे अशी शिवबुध्द संघटेनेची मागणी आहे
*लरुग्ण जगला पाहिजे, महाराष्ट्राचा नागरिक जगला पाहिजे तरच तो उघड्या डोळ्याने येणारे सरकार पाहू शकेल असं मुटकुळे यांनी म्हटलं आहे.पुढे बोलताना मुटकुळे म्हणाले*ल
महामहीम राज्यपालांनी रुग्णांना व शेतकऱ्यांना थेट मदत मिळावी यासाठी महाराष्ट्राचा दौरा करावा व राज्यातील हजारो गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ चे मदतीचे दरवाजे राज्यासाठी खुले करावेत
राज्यातील धर्मादाय आयुक्तांना तात्काळ आदेश देऊन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विशेष व्यवस्था करावी
अशी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र संघटनेची मागणी आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button