Amalner

?️अमळनेर कट्टा…जमावबंदी व संचारबंदीची ऐशी की तैशी..! सुस्त प्रशासनाचा जनतेवर कोणताही वचक नाही…!आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष प्रांत मॅडम हा डेल्टा आहे याला “इग्नोर” करू नका..!

?️अमळनेर कट्टा…जमावबंदी व संचारबंदीची ऐशी की तैशी..! सुस्त प्रशासनाचा जनतेवर कोणताही वचक नाही…!आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष प्रांत मॅडम “इग्नोर” करू नका..!

नियमांचे धडधडीत उल्लंघन.. बाजारपेठेत गर्दी… नियमांचे उल्लंघन करणा-या फक्त ४ दुकानांवर दंडात्मक कारवाई..!

अमळनेर – महाराष्ट्रात डेल्टा प्लस आजाराचे रूग्ण आढळून आल्यामुळे राज्य प्रशासनाने नवीन निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार दुपारी चार वाजेनंतर दुकाने बंद ठेवावेत व दिवसा सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण संचारबंदी व जमावबंदीच्या आदेशास नागरिकांनी धाब्यावर बसवत प्रशासन किती ढिसाळ आहे याची प्रचिती दिली.निर्धारित वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवणा-या काही दुकानांवर दंडात्मक कारवाई केली असली तरी फक्त चारच दुकाने सुरू होती का? इतर सुरू असलेल्या दुकांनाचे काय..?त्यांच्यावर का कार्यवाही केली गेली नाही..?अमळनेर च्या सुस्त प्रशासनाने नेहमीच दुजाभाव करत एकाला काखेत तर एकाला पायाशी ठेवले आहे. या संदर्भात अनेक तक्रारी पुराव्यानिशी करून देखील या प्रशासनाच्या “घर जावयांवर”कार्यवाही झाली नाही. दिवसरात्र कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ह्या मोठ्या धेडां वर कोणतीही कारवाई होत नाही..मात्र सामान्य गरजू छोटा लोटगाडी वाल्यावर मात्र पटकन कार्यवाही केली जाते..डेल्टा प्लस आजाराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.पण ही कार्यवाही व नियम सर्वांना सारखे असणे आवश्यक आहे.

सोमवार पासून या नियमांचे पालन करण्याचे आदेश असतांना देखील बाजारात वेळेनंतरही अनेक दुकाने सुरू होती. नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. प्रशासनाचे निर्बंध नागरिकांनी धाब्यावर बसवून व्यवहार सुरू आहेत.व्यापारी यांनी आजही नियम झुगारून लावले होते. तर बाजारपेठ,भाजी बाजार, भागवत रोड,सिंधी बाजार,कुंटे रोड या भागातील दुकाने सुरू होती. बहुतेकांनी मास्क लावलेले नव्हते. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सींग, जमावबंदीचे पालन याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे!ह्या चार दुकानांवर कारवाई..!नपाच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख राधेश्याम अग्रवाल आणि त्यांच्या पथकाने दुपारी ४ वाजेनंतर दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यानंतरही दुकाने सुरू ठेवणा-या चार दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात जयवंत पवार,अनिल भोई,शिवशक्ती पावभाजी,रवि पाटील यांचा समावेश आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button