Maharashtra

येवल्यात बारावीमध्ये मुलींची बाजी

येवल्यात बारावीमध्ये मुलींची बाजी

प्रतिनिधी शांताराम दुनबळे

नाशिक :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, तालुक्यात यंदा विद्यार्थीनींनी बाजी मारल्याचे दिसून आले. एन्झो – केम महाविद्यालयातील तेजल विश्वास सोनावणे हिने गणित विषयात तर स्वामी मुक्तानंद महाविद्यालयातील हर्षलीनी बाळू पांढरे, मानसी संजीव नाकोड, सिद्धी राजेश शेजपुरे या तीन विद्यार्थीनींनी संस्कृतमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
एन्झो केम महाविद्यालयातील शाखानिहाय प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी वाणिज्य शाखा :- रेणुका शशिकांत अनकाईकर (८७.३८) टक्के अकाउंट विषयात ९८ गुण, निखिल वाल्मिक इंगळे (८३.३८),प्रसाद मिलिंद पवार (८२.९२ टक्के) अकाउंट विषयात ९८गुण, कला शाखा :- नूतन अप्पासाहेब मोरे (८७.२३), मोनाली उत्तम जोरवर (८४.१५) ,दिपाली बाबासाहेब देशमुख (७९.२३),विज्ञान शाखा :- शुभम आबासाहेब पवार (८७.२३),मोनाली ईश्वर सोनावणे (८४),साक्षी दत्तकुमार उटवाळे (८३.६९)
स्वामी मुक्तानंद महाविद्यालयाची विज्ञान शाखेचा विद्यार्थी ओंकार सुनील रायजादे ९१.४१ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम तर ऋतुजा संजय नागडेकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
अंदरसुल मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनावणे ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स अँड सायन्स ची भाग्यश्री देशमुख ही वाणिज्य शाखेत ८८ टक्के गुण मिळून तालुक्यात प्रथम आली आहे. महाविद्यालयाचा निकाल ८७ टक्के इतका लागला. विज्ञान शाखेचा १०० टक्के, वाणिज्य ९२ टक्के तर कला शाखेचा ६२ टक्के निकाल लागला आहे.
शाखणीहाय निकाल विज्ञान शाखा :- दिपाली अशोक जाधव (८४.३१),पुनम हरिभाऊ साळुंके (८३.०८) अथर्व भास्कर सैंदर (८०.७७), वाणिज्य शाखा :- भाग्यश्री भाऊसाहेब देशमुख (८८),विशाल संजय वाकचौरे (७९.०८),साक्षी दीपक सोनावणे (७६.१५), कला शाखा:- कृष्णा वाल्मिक उंडे (७२), अर्चना पांडुरंग म्हस्के (६७.२३), सौरभ भाऊसाहेब दाभाडे (६५.२३)यशस्वी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button