Maharashtra

अमळनेर नगरपरिषदेचा “अस्वच्छ”कारभार….

अमळनेर नागरपरिषदेचा “अस्वच्छ”कारभार….

स्वच्छ अमळनेर सुंदर अमळनेर संकल्पनेचे वाजले बारा…

अमळनेर 

अमळनेर नगरपरिषदेचा &Quot;अस्वच्छ&Quot;कारभार....

अमळनेर येथील नगरपरीदेच्या हद्दीत येणारा  काही भाग वगळता  परिसर हा नेहमीच अस्वच्छ असतो.गटारी काढल्या जात नाहीत,रस्ते स्वच्छ केले जात नाहीत.प्रत्येक वेळी नागरिकांनी फोन करावा की आमच्या कडे गटार काढायला या,रस्ते झाडायला या असे रीतसर आमंत्रण नागरपरीदेच्या कर्मचाऱ्यांना द्यावे लागते त्यातही ते सांगितलेल्या वेळेवर येतच नाहीत.”स्वच्छ भारत स्वच्छ अमळनेर” चा नारा कुठं बोंबलत बसला आहे काय माहीत ? फक्त निवडणूक पुरताच हा नारा दिला गेला की काय असे आता वाटायला लागले आहे. लोकप्रतिनिधी तर दुर्लक्ष करतातच पण नगरपरिषद प्रशासनही ढिम्म आहे.कर्मचारी,अधिकारी वेळेवर नगरपरिषदेत उपस्थित नसतात. एकूणच लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षा मुळे स्वच्छ अमळनेर संकल्पनेचे “बारा”वाजले आहेत .

अमळनेर नगरपरिषदेचा &Quot;अस्वच्छ&Quot;कारभार....

पावसाळा जवळ आला असताना अजूनही गटारीची साफ सफाई झाली नाही काही भागात गटारी ओव्हर फ्लो होऊन रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही बाजूनी गटारी बंद आहेत त्यामुळे पाणी पुढे वाहून जाऊ शकत नाही.

अमळनेर नगरपरिषदेचा &Quot;अस्वच्छ&Quot;कारभार....

 सगळी कडे कचरा घाण,अस्वच्छता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. नागरिक यामुळे हैराण झाले आहेत.नगरपरिषदेला जाग आली तर चांगली गोष्ट आहे अन्यथा स्वतः नागरिक गटारीची घाण काढून गांधीगिरी करणार आहेत. याची नोंद प्रशासनाने घ्यावी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button