चांपा/नागपूर

अखेर सरपंचाच्या पुढाकाराने डी.पी. जन कंपनीत चांपा येथील गरजू बेरोजगार युवकांना रोजगार

अखेर सरपंचाच्या पुढाकाराने डी.पी. जन कंपनीत चांपा येथील गरजू बेरोजगार युवकांना रोजगार

चांपा : नागपूर अनिल पवार

चांपा येथील गरजू बेरोजगार युवकांना रोजगार कसा? मिळुन देता येईल याकडे सरपंच अतिश पवार यांनी गांभीर्यानं लक्ष दिले असून चांपा गावातील गोरगरीब गरजूं १५ युवकांना रोजगार उपलब्ध करण्यास अखेर सरपंच अतिश पवार यांना यश आले .सरपंच अतिश पवार यांनी उर्वरीत गावातील गरजू युवकांना लवकरच रोजगार मिळणार असल्याचे सरपंच अतिश पवार यांनी सांगितले .

चांपा गावातील १००पेक्षा जास्त बेरोजगार गरजू युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास सरपंच अतिश पवार यांनी पुढाकार घेतला आहे .

सरपंच अतिश पवार यांच्या प्रयत्नाने नागपुर -उमरेड महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम हाती घेतलेल्या डि.पी, जन कंपनीत १५ गरजू बेरोजगार युवकांना रोजगार मिळुन देण्यासाठी अखेर सरपंच अतिश पवार यांना यश आले असून युवकांना दर महा १६०००रुपये मासिक मानधन देणार असल्याचे डि.पी.जन चे जि .एम जितेश भोयर यांनी सांगितले . उर्वरीत चांपा येथील गरजू बेरोजगार युवकांना लवकरच रोजगार उपलब्ध करून देण्याचं डि, पी, जन कंपनीचे जि.एम .जितेश भोयर यांनी सांगितले .यावेळी गरजू बेरोजगार युवकांच्या चहऱ्यावर हास्य फुलले असून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्ल सर्व युवकांनी सरपंच अतिश पवार यांचे आभार मानले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button