Pandharpur

भाजपा युवा मोर्चा, पंढरपूर तर्फे १००० किट चे टारगेट पूर्ण

भाजपा युवा मोर्चा, पंढरपूर तर्फे १००० किट चे टारगेट पूर्ण

प्रतिनिधी रफिक आतार

मदत नव्हे तर कर्तव्य या भावनेने पंढरपूर शहरातील संतपेठ या विभागामध्ये भाजपा युवा मोर्चा पंढरपूर मध्ये लॉकडाऊनच्या काळात १००० घरांना मदत करण्याचे टारगेट, ध्येय ठेवले होते. त्यासाठी भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गरजूंसाठी चहा, साखर, शेंगादाणे, तूरडाळ, तेल, मीठ, साबण, इत्यादीचा समावेश असलेले कीट तयार केले. हे कीट योग्य आणि गरजूंपर्यंतच जावे यासाठी गरजूंची नोंद करून घेतली होती.

त्याप्रमाणे संत पेठ, गुजराथी कॉलनी, वडार गल्ली, जगदंबा वसाहत, सुडके गल्ली, लकेरी गल्ली, न्यू बागवान मोहल्ला, सांगोला चौक, गरड गल्ली, ९ नंबर शाळेजवळील परिसर, नवले वाडा सासवडकर वाडा, ओतारी वाडा, सात नंबर शाळेजवळील परिसर, भाई भाई चौक, ज्योतिबा मंदिराजवळ, आराम गादी कारखाना जवळ, सांगोला रोड, महावितरण ऑफीसच्या पाठीमागील परिसर, मंगळवेढा रोड 32 खोल्या. महापूर चाळ, इत्यादी ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, सर्व नियमांचे पालन करत या कीटचे १००० पेक्षाही जास्त घरांत वाटप करण्यात आले.

याकामी गेले दिड महिना रोज भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विदुल अधटराव व त्याचे सहकारी परिश्रम घेत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button