Solapur

रोटरी क्लब ऑफ माढा चे जिल्हास्तरीय राष्ट्र शिल्पकार पुरस्कार जाहीर.

रोटरी क्लब ऑफ माढा चे जिल्हास्तरीय राष्ट्र शिल्पकार पुरस्कार जाहीर.

रफीक अत्तार सोलापूर

सोलापूर : रोटरी क्लब ऑफ माढा जिल्हा सोलापूर च्या वतीने दिले जाणारे जिल्हास्तरीय राष्ट्र शिल्पकार पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे आज रोटरी क्लब ऑफ माढा चे अध्यक्ष रो.प्रा.अशोक लोंढे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
BEO office कडून प्राप्त नामांकन
श्री.शिवाजी दिगंबर येडे (करमाळा),
श्रीम.कल्पना गोविंद घाडगे (माढा),
श्रीम.राजश्री काशिनाथ बुगडे (मंगळवेढा),
श्री.मल्लिनाथ चंद्रशेखर निंबर्गी (उत्तर सोलापूर),
श्रीम.सुनिता यशवंत वनस्कर (दक्षिण सोलापूर),
श्री.धनाजी पोपट हेगडकर (माळशिरस),
श्री. खुशालद्दीन उस्मान शेख(सांगोला),
श्री.महेश नवनाथ गोडगे(मोहोळ),
श्री.गणपत रघुनाथ खंदारे (बार्शी),
सौ.राजश्री शरणप्पा उप्पीन (अक्कलकोट),
श्री.ज्ञानेश्वर सुखदेव विजागत (पंढरपूर)
डाएट सोलापूर यांच्याकडून प्राप्त नामांकन.
श्री.चंद्रकांत शामराव नरळे (अधिव्याख्याता),
श्री.अविनाश विजयकुमार शिंदे ( जिल्हा समन्वयक),
श्री.रेवणनाथ सुखदेव आदलिंग(विषय साधनव्यक्ती),
कु.प्रभा गहिनीनाथ चव्हाण(विशेष तज्ञ)
श्रीम.विद्या अंबादास रोटे( विशेष शिक्षक),
आश्रमशाळा तालुका संपर्क प्रमुख यांच्या कडून प्राप्त नामांकन
प्रविण अरुण घाडगे(माढा)
ज्ञानदेव हरिश्चंद्र डुकरे (जामगाव)
प्रकाश ज्ञानदेव जाधव (केवड)
रामा गोरख घोगरे (अंजनगाव खे.)
Superviser यांच्याकडून प्राप्त नामांकन
किसनाबाई अर्जुन शिंदे अंगणवाडी सेविका(वडशिंगे)
गटशिक्षणाधिकारी पं. स.माढा यांच्याकडून प्राप्त नामांकन
श्री. बंडू महादेव शिंदे (शिक्षण विस्तार अधिकारी)
डॉ. विलास काळे (केंद्रप्रमुख- अरण)
रोटरी ही सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य, पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. रोटरी मार्फत रोटरी इंडिया लिटरसी मिशन द्वारे शिक्षण क्षेत्रात TEACH हा कार्यक्रम राबवला जातो. याअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्र शिल्पकार पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. शिक्षकांचे ज्ञानदानाचे कार्य अधिक दिव्य, प्रभावी व प्रेरणादायी व्हावे यासाठी शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे सहाय्यक प्रांतपाल रो. डॉ.सुभाष पाटील यांनी सांगितले.
रोटरी दरवर्षी माढा शहर व परिसरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना व प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांना राष्ट्र शिल्पकार पुरस्कार देऊन सन्मानित करत आली आहे.मात्र यावर्षी रोटरी क्लबने सोलापूर जिल्हा कार्यक्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांचा व अधिकाऱ्यांचा गौरव करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत संबंधित तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्या मार्फत जिल्हास्तर व तालुकास्तरावर शिक्षण व प्रशिक्षणा साठी कार्य करणाऱ्या अधिव्याख्याता, जिल्हा समन्वयक, विषय साधनव्यक्ती, विशेष तज्ञ, विशेष शिक्षक यांची पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. याबरोबरच माढा तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी व उत्कृष्ट कार्य असणारे केंद्रप्रमुख व अंगणवाडी सेविका यांचाही सन्मान या राष्ट्र शिल्पकार पुरस्काराने करण्यात येणार आहे. या बरोबरच महाराष्ट्र शासनाने निवडलेली आदर्श शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माढा मुले क्र.१ या शाळेचा गौरव करण्यात येणार आहे .अशी माहिती राष्ट्र शिल्पकार पुरस्काराचे प्रोजेक्ट डायरेक्टर रो.प्रविण भांगे यांनी दिली.रोटरी इंटरनॅशनल कडून मिळालेले मानपत्र, ट्रॉफी, फेटा असे पुरस्काराचे स्वरूप असेल.
हा राष्ट्र शिल्पकार पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार दिनांक १९ जानेवारी २०२१ रोजी जगदाळे मंगल कार्यालय, माढा येथे सकाळी ११:०० वा. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सोलापूर चे मा.प्राचार्य डॉ.रामचंद्र कोरडे तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल रो. हरीश मोटवानी यांच्या हस्ते व डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो.अनिल चंडक, असिस्टंट गव्हर्नर रो. डॉ.सुहास खडके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याचे रोटरी क्लब चे सचिव रो. किरण चव्हाण यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button