Paranda

खासगाव येथे स्वस्त धान्य दुकानातून मोफत तांदुळाचे वाटप

खासगाव येथे स्वस्त धान्य दुकानातून मोफत तांदुळाचे वाटप

परंडा प्रतिनिधी सुरेश बागडे दि. २०

संपूर्ण जगाला हैराण करणाऱ्या व जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस भारतातुन हद्पार करण्यासाठी व फैलाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन पुकारले आहे.माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेज मधील मोफत अन्नधान्याचे रेशन धान्य दुकानदारांकडून वाटप सुरू करण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात सध्या सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्योग धंदे व रोजगाराची साधने सर्वच ठप्प आहे. अशात गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाने अंत्योदय,बीपीएल शिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. याच अंतर्गत स्वस्त धान्य दुकानात धान्य पोहचवून त्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे.याचा सर्वत्र लाभ घेतला जात असून या संकटाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरगरीबांना मोफत धान्य मिळवून दिल्या बद्दल जनतेकडून आभार व्यक्त केले जाते आहे.

पुरवठा विभागानेही सक्रिय भूमिका राबवित तालुक्यातील ८०% टक्के दुकानदार पर्यंत रेशन दुकानांना धान्य उपलब्ध करून दिले आहे. ह्या अनुषंगाने खासगाव येथील सावित्रीबाई महिला बचत गट धान्य दुकानातून मोफत तांदळाचे वाटप करण्यात येत आहे अशी माहिती तलाठी विनोद चुकवाड यांनी दिली

गाव पातळीवर प्रत्येकाने सॅनिटायझरने हात स्वच्छ धुऊन सोशल डिस्टन्सचे अंतर ठेवून लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येत आहे. या कार्यात दक्षता कमिटीकडून मोठे सहकार्य मिळाल्याचे खासगाव सज्जा तलाठी विनोद चुकवाड यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button