Paranda

आसू ग्रामपंचायत च्या मासीक सभेत राडा दोन सदस्या सह तिघा विरूद्ध गुन्हा दाखल

आसू ग्रामपंचायत च्या मासीक सभेत राडा दोन सदस्या सह तिघा विरूद्ध गुन्हा दाखल

मासीक सभा उधळली ग्रामसेवकला जिवे मारन्याची धमकी

परंडा प्रतिनिधी सुरेश बागडे दि.०७

आसू ग्रामपंचायत च्या सत्ताधारी मध्ये गेल्या वर्षी पडलेली वादाच्या ठिणगीचा भडका झाला असुन
मासीक सभेत उप सरपंच च्या गटाने मासीक सभेत गोंधळ करून ग्रामसेवक चौधरी यांना शिवीगाळ करीत जिवे मारन्याची धमकी देऊन सभा उधळून लावली आहे.

हि घटना दि ६ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात घडली या प्रकरणी ग्राम पंचायत च्या दोन सदस्या सह तिघा विरूद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल करन्यात आल्याने खळबळ उडाली आहे .

या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की आसू ग्रामपंचायत ची मासीक सभा दि ६ मे रोजी सरपंच अनिता महालिंग राऊत यांच्या अध्यक्षते खाली बोलावण्यात आली होती.

या मासीक सभे साठी सरपंच अनिता राऊत , उप सरपंच कालिंदा जगताप , निशा माने , सविता मारकड , श्रावण गणगे , रोहिदास बुरूंगे , शाशीकांत खुने , यांच्या सह ९ सदस्या पैकी ७ सदस्य हजर होते .

यावेळी सरपंच व ग्रामसेवक हरिश्चंद्र चौधरे हे सभा घेत असताना विरोधी सदस्य कालींदा जगताप , निशा माने , रोहिदास बुरंगे , शशीकांत खुने, या चार सदस्यांनी आमच्या म्हणन्या प्रमाणे सभेत विषय का घेत नाही असे म्हणत आम्ही सहया करनार नाही अभी भुमीका घेतली .

यावेळी ग्रां.पचायत सदस्य रोहिदास बुरूंगे व शशीकांत खुने यांनी सभा उधळून लावत ग्रामसेवक चौधरी यांना शिवीगाळ करीत मारन्या साठी ग्रामसेवक चौधरी यांच्या अंगावर धाऊन गेले .

व अमोल जगताप यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन ग्रामसेवका च्या तोंडाला काळे लावा हाणा त्याला लई माजला आहे आमच्या म्हणन्या नुसार सभेत विषय का घेत नाही असे म्हणत तुला मारल्या शिवाय राहनार नाही अशी धमकी ग्रामसेवक यांना दिली ,

ग्राम पंचायत कार्यालया मध्ये सभा सुरू असताना गोंधळ घालुन शिवीगाळ करत जिवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी ग्रामसेवक हरिश्चंद्र चौधरी यांच्या फिर्यादी वरून ग्रा. पंचायत सदस्य शशीकांत खुणे , रोहिदास बुरूंगे व अमोल जगताप यांच्यावर परंडा पोलिसात दि ६ मे रोजी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी कलम ३५३ , २९४ , ३४ नुसार गुन्हा दाखल करन्यात आला आहे .

पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कविता मुसळे करीत आहेत .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button