Paranda

देव दर्शन करून निघालेल्या भाविकावर काळाचा घाला सोनारी परंडा रोडवर भिषण अपघात २ जन ठार १० जन गंभीर जखमी

देव दर्शन करून निघालेल्या भाविकावर काळाचा घाला सोनारी परंडा रोडवर भिषण अपघात २ जन ठार १० जन गंभीर जखमी

परंडा प्रतिनिधी सुरेश बागडे

शनी सिंगणापुर येथून देव दर्शन करून निघालेल्या भावीकांच्या पीकअपला परंडा सोनारी रोडवर खानापुर पाटी जवळ भिषण अपघात झाल्याने भुम तालूक्यातील नळेगाव येथील २ जन ठार तर १० जन गंभीर जखमी झाले हि घटना दि १३ रोजी रात्री साडे दहा वाजन्याचा सुमारास घडली .

अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे , सहाय्यक पोलिस उप निरिक्षक जगताप यांच्या पथकाने घटना स्थळी धाव घेऊन जखमींना उपचारा साठी उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले .

या अपघातात भुम तालूक्यातील नळेगाव येथिल मंगेश आत्माराम गायकवाड वय २६ याचा व बार्शी येथे उपचारा साठी दाखल केलेल्या एका तरूणाचा मुत्यू झाला आहे .

या बाबत प्राप्त माहिती अशी की भुम तालुक्यातील वडगाव नळी येथिल भावीक शनि सिंगणापुर येथील कावड यात्रा करून पीकअप वाहनाने गावा कडे परतत असताना परंडा सोनारी रोड खानापुर पाटी जवळ पीकअप व उस वाहतूक करनाऱ्या टॅक्टर ची धडक बसुन भिषण अपघात झाला या मध्ये २ जन ठार तर १० जन गंभीर जखमी झाले आहे .

या अपघाता मध्ये गंभीर जखमी झाल्याने वैभव भोजने , शुभम थिटे , प्रतिक भोजने , स्वप्नील भोजने , विनोद लोकरे , नवनाथ
हारनोळ यांना पुढील उपचारा साठी बार्शी येथिल रुग्णालया दाखल
करन्यात आले आहे .

तर रोहित इनामदार , बिरूदेव हजारे , श्रीकृष्ण झेंडरे , नवनाथ शोगे , सर्व राहनार वडगावनळी तर सावरगाव येथिल दादा कांबळे यांच्या वर परंडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे .

या प्रकरणी परंडा पोलिसात गुन्हा दाखल करन्याची प्रक्रीया सुरू आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button