Faijpur

यावल तालुका विधी सेवा समिती यांचेमार्फत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेविषयक शिबिराचा कार्यक्रम दि. 14 गुरुवार रोजी नगरपालिका सभागृहात घेण्यात आला

यावल तालुका विधी सेवा समिती यांचेमार्फत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेविषयक शिबिराचा कार्यक्रम दि. 14 गुरुवार रोजी नगरपालिका सभागृहात घेण्यात आला

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल न्यायालयाचे न्यायमूर्ती एम एस बनचरे होते.
यावल न्यायालयाचे न्यायमूर्ती एम एस बनचरे, न्यायमूर्ती डामरे, प्रांताधिकारी कैलास कडलग, नगराध्यक्ष महानंदा होले, एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, एडवोकेट शेख खालीद, एडवोकेट किशोर सोनवणे व्यासपीठावर उपस्थित होते
कार्यक्रमाला एडवोकेट आकाश चौधरी, एडवोकेट नितीन भावसार, एडवोकेट नितीन चौधरी, एडवोकेट हेमांगी चौधरी , एडवोकेट निलेश मोरे , एडवोकेट दत्तात्रय सावकारे, एडवोकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष धीरज चौधरी, पी एल व्ही सदस्य, शशिकांत वरुडकर, हेमंत फेगडे, खाचणे, नंदकिशोर अग्रवाल, शिकाऊ विद्यार्थी, नपा कर्मचारी नागरिक महिलाची उपस्थिती होती.
शहरासह दुर्गम भागातील नागरिकांना विविध कायद्याची माहिती व्हावी यासाठी मार्गदर्शन शिबिराचे कार्यक्रम सुरू आहे. अन्याय झालेलीच व्यक्ती न्यायालयात न्याय मागते. विविध कायद्यांची माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम एस बनचरे यांनी दिली.
यांनीही केले मार्गदर्शन
एडवोकेट शेख खालीद, मुस्लिम पर्सनल लॉ एडवोकेट किशोर सोनवणे फौजदारी व दिवाणी, एडवोकेट आकाश चौधरी लोक अदालत, एडवोकेट नितीन भावसार कायदा सर्वांसाठी समान, एडवोकेट नितीन चौधरी विविध कायद्यांची माहिती, एडवोकेट हेमांगी चौधरी सायबर कायदा, प्रांत कैलास कडलग यांनी शासकीय योजनांची व शासकीय कायद्यांची माहिती दिली.
मुनिसिपल हाई स्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी बेटी बचाव बेटी पढाव चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. 50 विद्यार्थीनी चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवला.
सुभाष चौकात हुंडाबळी महिलावर अत्याचारया विषयी पथनाट्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर अग्रवाल यांनी केले तर आभार दिलीप वाघमारे यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button