Patur

महिला प्राध्यापिकेचा संस्थाध्यक्षाने केला विनयभंग पातूर पोलिसांत गुन्हा दाखल

महिला प्राध्यापिकेचा संस्थाध्यक्षाने केला विनयभंग पातूर पोलिसांत गुन्हा दाखल

विलास धोंगडे

पातूर : शहरातील असलेल्या महात्मा फुले आर्टस अँड सायन्स कॉलेज चे संस्थाध्यक्ष व सचिव ने प्राध्यापकिचा विनयभंग केल्याचि घटना दिनांक 22सप्टेंबर ला दुपारी 11 वाजता चे दरम्यान घडली.
सविस्तर वृत्त असे कि महात्मा फुले आर्टस अँड कॉलेज चे संस्थाध्यक्ष, सचिव व कर्मचारी यांच्यात काही दिवसांपासून अनेककारणामुळे वादविवाद सुरु होते. यापूर्वी सुद्धा कॉलेज च्या कर्मचाऱ्यांनी मागील महिन्यात संस्थाध्यक्ष व सचिव यांच्या विरुद्ध एक दिवसीय आंदोलन छेडले होते.या घटनेचा राग मनात असलेल्या संस्थाध्यक्ष व सचिव असलेल्या बापबेट्यानी कर्मचारी वर्गासोबत अपमानजनक व्यवहार करण्यास सुरुवात केली असता आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी कॉलेज च्या प्राध्यापक महिला व कर्मचारी स्टाफ कॉलेज मध्ये जाऊन आमचे पगार केव्हा देता व एक दिवसीय संप पुकारला होता, त्याचा पगार कपात का केला असे विचारले असता संस्थाध्यक्ष सुभाष बोचरे व सचिव हरीश सुभाष बोचरे या बाप बेट्यानी महिला प्राध्यापक हिस शिवीगाळ करून लोटलाट करून महिला प्राध्यापकेचा विनयभंग केला महिला प्राध्यापक ने तात्काळ पोलीस स्टेशन गाठून संस्थाध्यक्ष सुभाष बोचरे व सचिव हरीश बोचरे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली.
पातूर पोलिसांनी आरोपी सुभाष बोचरे व आरोपी हरीश बोचरे यांच्याविरुद्ध अप नंबर 518/20 कलम 354, 504, 506 भादंवि गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button