Amalner

गळफास घेऊन महिलेची आत्महत्या..!

गळफास घेऊन महिलेची आत्महत्या..!

अमळनेर येथील आनंद कॉलनी, ढेकू रोड येथील रहिवासी सोनिया काटे ह्या महिलेने घरातच ओढणी व दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोनिया घनश्याम काटे (वय ३४) ह्या महिलेने 12 सप्टेंबर रोजी पहाटे पावणे तीन वाजेता आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ह्या महिलेचे पती घनश्याम मुरलीधर काटे हे मंगळग्रह मंदिरात कार्यरत आहेत.12 तारखेला रात्र पाळीच्या ड्युटीला गेले असताना या वेळी सोनियाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर महिला मानसिक रुग्ण असल्याची माहिती मिळाली असून धुळे येथील डॉ. गौतम शहा यांच्याकडे उपचार सुरू होते. सुनील काटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button