Jalgaon

Jalgaon Live: कांद्यावरील 40% निर्यात शुल्क रद्द करावे – जळगाव जिल्हा आम आदमी पार्टीची मागणी

Jalgaon Live: कांद्यावरील 40% निर्यात शुल्क रद्द करावे – जळगाव जिल्हा आम आदमी पार्टीची मागणी

केंद्र सरकारने कांद्यावर अन्यायकारक पद्धतीने 40 टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष असल्यामुळे त्यांच्या मागणीनुसार,जळगाव जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याविरोधात निवेदन देण्यात आले.
आधीच सर्व शेतकऱ्यांची अवस्था आर्थिकदृष्ट्या वाईट असताना कांद्यासारख्या नगदी पिकाला चांगला भाव देशात व विदेशात मिळण्याची शक्यता वर्तवली जात असताना शेतकऱ्याच्या तोंडातून घास हिरावून घेण्याचे काम निर्यात शुल्क वाढवल्यामुळे होणार आहे. सदर बाब ही शेतकरी विरोधी आहे.म्हणून सदर 40 टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यात यावे अशी मागणी जळगाव जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली.लवकरात लवकर सदर वाढ रद्द झाल्यास, रास्ता रोको करण्याचा ईशारा यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे,यावेळी जळगाव जिल्हा अध्यक्ष मिलिंद चौधरी.माजी जळगाव शहर महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर.मीडिया प्रमुख योगेश भोई.डॉ.अनुजा पाटील.सरिता तायडे.डॉ नारायण अटकोरे.पवन खंबायत.ओम प्रकाश अग्रवाल.भीमराव मोरे.शरद सपकाळे.आदी कार्यकर्ता व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button