Amalner

एक पत्रकार म्हणून जाहिरात न घेणारी व्यक्ती खंडणी मागते तेंव्हा..?वाचा अजबगजब कहाणी…!

एक पत्रकार म्हणून जाहिरात न घेणारी व्यक्ती खंडणी मागते तेंव्हा..?

अमळनेर ठोस प्रहार न्यूजच्या ऑनलाइन न्यूज संपुर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि जगात मोठ्या संख्येने वाचक वाचतात.गेल्या 9 वर्षांपूर्वी पत्रकारिता क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली.

अमळनेर तालुक्यात मोठं मोठे कपडा,सराफ,दारू व्यापारी,डॉक्टर्स,संस्था,शैक्षणिक संस्था,राजकीय नेते, अवैध धंदे करणारे, वाळू माफिया,रेशन माफिया,सरकारी अधिकारी कर्मचारी इ कार्यरत आहेत. त्यांनी एखादा अपवाद वगळता जाहिरात दिली किंवा मी त्यांच्या कडे मागितली असे अगदी प्रामाणिक पणे सांगून दाखवावे..!कोणालाही त्रास दिला नाही.. ना वर्धापनदिन ..ना वाढदिवस.. ना उद्दघाटन..ना शासकीय निविदा काहीही नाही…

मला कोणाचं प्रेशर नाही जाहिराती साठी..! कारण मीच मालक आहे..!

विशेष म्हणजे संपूर्ण जगात वाचक..एकाच वेळी हजारो लोक वाचतात..

अमळनेर तालुक्यात प्रथमच एक महिला पत्रकार कार्यरत झाली.खरतर हा अमळनेर च्या महिला आणि नागरिक यांच्यासाठी अभिमान आणि गर्वाचा भाग ..!ह्या कार्याला सुरुवात झाली ती एका न्यूज चॅनल मध्ये काम करण्यापासून..!पुढे दोन वेगवेगळ्या वर्तमानपत्रात काम केल्यानंतर स्वतःच एक हक्काचं न्यूज असावं असं मनात आलं आणि महाराष्ट्र मराठी 7 हे न्यूज पोर्टल सुरू केलं.या सोबत ऑनलाइन व्हिडीओ न्यूज देखील याच नावाने सुरू केलं.या सर्वांना वाचक आणि व्हीवर्सनी भरपूर प्रेम आणि सहकार्य केले. त्यानंतर त्याच न्यूज पोर्टलचे नाव बदलून ठोस प्रहार न्यूज सुरू झाले.ह्या सर्व प्रवासात वाचकांचे खूप प्रेम,सहकार्य आणि आशिर्वाद मिळाले.अनेकांनी भरभरून दाद दिली,तर कोणी टिका केली..टीकेचे स्वागत करत त्यातून चूक कशी दुरुस्त करता येईल हाच दृष्टिकोन समोर ठेवला.कुणाशीही स्पर्धा न करता फक्त आपलं काम हेच एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू आहे..

या सर्व प्रवासात पत्रकारांची हक्काची जाहिरात घेणे हा देखील विषय केला नाही.कुणालाही जबरदस्ती केली नाही.. म्हणजे फक्त आता 9 ऑगस्ट 2021 रोजी 6 जाहिराती लावल्या त्यातही 2 जणांकडे अजून ही जाहिरातीचे पैसे बाकी आहे.. हा एक अनुभव असा होता की पुन्हा फिरून जाहिरात स्वतः हुन कोणाकडे मागणार नाही हे ठरवूनच टाकलं..कारण जाहिरात मागा आणि मग पैसे मागत फिरा हे जमलंच नाही.आणि जमणार ही नाही.

देशातच नव्हे तर जगात पत्रकारिता करत असताना मोठं मोठे वृत्तपत्र जाहिराती घेतात.प्रतिनिधी नेमताना जाहिरातीचे टार्गेट दिले जाते. ते पूर्ण करावेच लागते अन्यथा हकालपट्टी होते.यामुळेच दोन मोठ्या news channel च्या ऑफर मी सोडल्या. या अनुषंगाने अमळनेर तालुक्यातील अनेक जण काम करतात.माझे संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी कार्यरत आहेत. आजपर्यंत एकही प्रतिनिधी ला जाहिरात आणण्यासाठी दबाव नाही.कोणतीही जबरदस्ती नाही बंधन नाही..!विचार करण्यासारखा विषय आहे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिनिधींना जाहिरात घेण्यास बंधन टाकले सर्व दूर असलेल्या टक्केवारी प्रमाणे माझे उत्पन्न किती होऊ शकेल..!पण जे जमत नाही ते जमतच नाही..!हक्काच्या जाहिरात मी घेत नाही आणि पत्रकार म्हणून खंडणी मागायला गेली म्हणे..!अजबच आहे असो अजबगजब गोष्टी होत राहतात ह्या देशात ,राज्यात,जिल्ह्यात,तालुक्यात.. कारण गजब लोक भेटतात..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button