?️ अमळनेर कट्टा…शेवटी महसूल विभागाला आली जाग..!गंगापुरी शिवारात तापी काठी 3 अवैध वाळू वाहतूक ट्रॅकटर ताब्यात..!महसूल विभागाची कार्यवाही..!
अमळनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या पाठीशी पोलीस विभागाप्रमाणे आता महसूल विभाग जोरात लागले असून आज रात्री 12.30 वाजता
गंगापुरी येथे तापी काठावर अवैध वाळू वाहतूक करणारे 3 ट्रॅकटर ताब्यात घेण्यात आले आहेत.3 ट्रॅकटर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
याबाबतीत सविस्तर माहिती अशी की अवैध गौण खणिज चोरी विरोधात कारवाई करीत असताना रेती माफिया गौण खनिज चोरी करण्यासाठी महसुल व पोलीस प्रशासनाची छापा कार्यवाही यशस्वी होवू नये याकरिता विविध उपाय योजना करत असतात.
दि,२१/०५/२०२१ रोजी रात्री १०.३०मिळालेल्या माहितीनुसार गंगापुरी येथे सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळल्यानन्तर
तहसिलदार सो अमळनेर श्री मिलींदकुमार वाघ, पुरूषोत्तम शिवाजी पाटील मंडळ अधिकारी नगाव भाग, हर्षवर्धन संतोष मोरे तलाठी हेडावे, तिलेश अशोक पवार मांडळतलाठी, संदिप शिंदे रनाईचे तलाठी, सतिश शिंदे सावखेडा तलाठी, सचिन बमनाथ तलाठी ब्राम्हणे, बळीराम नामदेव काळे तलाठी भरवस, जितेंद्र अशोक जोगी तलाठी सडावण बु. स्वप्नील अण्णाजी कुलकर्णी तलाठी जुनोने
गंगापुरी भागातील तापी नदी पात्रात होणारे अवैध गौण खनिज वाहतुकीस आळा बसविणेकामी मा सांगितल्यावरून मा.तहसिलदार सो अमळनेर तसेच मी व वरील नमुद अधिकारी व कर्मचारी असे शासकिय वाहने तसेच काही कर्मचारी खाजगी वाहनाने तहसिल कार्यालाय अमळनेर येथुन निघून जळोद गावापर्यंत गेलो.
त्यानंतर गावाचे बाहेर वाहने लपवून आमचे पथक प्रमुख यांनी दोन पथक तयार
केले.पथकात तिलेश अशोक पवार, संदिप शिंदे, सचिन बमनाथ, सतिश शिंदे, हर्षवर्धन मोरे असे व दुसरे पथकात ईतर सर्व होते. त्या पैकी आमचे पथक गंगापूरी शिवारातील तापी नदीच्या पात्रात उतरले व मा. तहसिलदार सो. याचे सोबत चे पथक तापी नदीच्या जळोद पुलावर दोन्ही बाजुस लपून बसले आम्ही तापी नदी पात्रात पोहचल्यावर दिनांक २२/५/२०२१ रोजीचे रात्री १२.३० वा.आम्हाला त्या ठिकाणी ६ ट्रक्टर वाळु भरतानां दिसले त्यातील तिन ठीकाणी व ईतर तिन थोड्या अंतरावर असल्याने आम्ही पुन्हा आमचे पथकाचे दोन भाग करत आम्ही वाळु भरत असलेल्या वाहनांना ताब्यात घेतले आहे. याबाबतीत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून
लाल रंगाचे महिंद्रा कंपनीचे ट्रक्टर क्र.एम एच १९ सिजे १५३३ वरील
चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जगन पावरा रा. बुधगाव व ट्रक्टर मालकाचे नाव महेश ज्ञानेश्वर पवार व अतुल ज्ञानेश्वर पवार रा.अनवर्दे ता. चोपडा असे आहेत.एकूण तीन ट्रॅकटर ताब्यात घेण्यात आले आहे.






