Paranda

रा गे शिंदे महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत  (प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी स्वतः ढोल वाजवून विद्यार्थ्यांचे केले स्वागत) 

रा गे शिंदे महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत (प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी स्वतः ढोल वाजवून विद्यार्थ्यांचे केले स्वागत)

सुरेश बागडे परंडा

परंडा : शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात शासनाच्या आदेशान्वये दि. 4 ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरामध्ये वाजत-गाजत पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत प्राचार्या डॉ दीपा सावळे यांच्या हस्ते करण्यात आले.

गेल्या दीड वर्षापासून गेल्या दीड वर्षापासून महाविद्यालय विद्यार्थ्या विना ओस पडले होते. विद्यार्थी हा देशाचा कणा असल्याने विद्यार्थी शिकला पाहिजे तसे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत होते परंतु आम्हालाही ते शिकवण्या मध्ये आणि विद्यार्थ्यांनाही शिकण्या मध्ये पाहिजे तेवढा रस येत नव्हता, तेव्हा सरकारने विद्यार्थ्यांचे हित पाहता आणि कोरोना चा प्रादुर्भाव पाहता जो निर्णय घेतला आहे तो अतिशय चांगला आहे विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. तेव्हा आम्ही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि ढोल-ताशांच्या गजरामध्ये वाजतगाजत करत आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील कला वाणिज्य विज्ञान विभागाचे सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मास्क आणि सॅनिटायझर चा वापर करावा असे प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी सांगितले.

यावेळी कनिष्ठ विभागातील प्राध्यापक प्रा दत्ता मांगले, प्रा ज्योतिबा शिंदे, प्रा संतोष भिसे, प्रा विलास गायकवाड ,प्रा विजय जाधव ,प्रा संभाजी धनवे ,प्रा दीपक हुके, प्रा तानाजी फरतडे, प्रा अंकुश शंकर ,प्रा प्रताप घुटे ,प्रा बि डी माने , प्रा शंकर कुठे, प्रा किरण देशमुख ,प्रा उत्तम कोकाटे, प्रा अनंत अनभुले ,प्रा प्रतिभा माने ,प्रा पायघन आदी यावेळी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button