Amalner

म.बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे आ.रोहित पवार यांचे स्वागत!

म.बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे आ.रोहित पवार यांचे स्वागत!

अमळनेर( )महात्मा बळीराजा स्मारक येथे भेट देत आ.रोहित पवार यांनी भेट दिली. लोकराजा बळीराजाचे पूजन केल्यानंतर म.बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे आ.पवार यांचा सत्कार करण्यात आला.
अमळनेर येथिल सुप्रसिद्ध असे म.बळीराजा स्मारकाला आ.रोहित पवार यांनी भेट देत बळीराजाच्या शिल्पाला वंदन केले.याप्रसंगी महात्मा बळीराजा लोकोत्सव समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,संदेश पाटिल,प्रशांत निकम,जयवंत शिसोदे,मराठा सेवा संघाचे कैलास पाटील, प्रा.विजय गाडे,यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला.त्यांच्यासोबत मा.आ कृषिभूषण साहेबराव पाटील,मा.नगराध्यक्ष विनोद पाटिल, नगरसेवक श्याम पाटील उपस्थित होते.आ.पवार यांना म.बळीराजा यांच्या स्मारकाचा अल्परीचय रणजित शिंदे यांनी करून दिला.उपस्थित कार्यकर्त्यांनी दिलेल्या जय जिजाऊ,जय शिवरायांच्या घोषणांनी यावेळी परिसरात जल्लोष पूर्ण वातावरण झाले होते.
याप्रसंगी बळीराजा समितीचे जेष्ठ कार्यकर्ते मनोहर पाटिल, अशोक बिऱ्हाडे, आर बी पाटील, मिलिंद निकम, अनंत सूर्यवंशी, आबा चौधरी, अजय भामरे,योगेश महाजन, ज्ञानेश्वर पाटील, आदिसह मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button