Ahamdanagar

लाडक्या जावयाचे पाथर्डी तालुक्यात जोरदार स्वागत, शिवसंपर्क अभियानांतर्गत ना.शंकरराव गडाख यांची अहमदनगर जिल्ह्यात घौडदौड ?

लाडक्या जावयाचे पाथर्डी तालुक्यात जोरदार स्वागत, शिवसंपर्क अभियानांतर्गत ना.शंकरराव गडाख यांची अहमदनगर जिल्ह्यात घौडदौड ?

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील व्रुद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेरमन अप्पासाहेब राजळे यांचे जावईबापू व महाराष्ट्र राज्याचे म्रूद आणि जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांचे पाथर्डी तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले. प्रथम करंजी येथे सन्मान करण्यात आला. नंतर तिसगाव येथे शिवसेनेचे पाथर्डी तालुका संघटक राजेंद्र म्हस्के आणि शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी संघटक सौ मंगलताई म्हस्के यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत ना.गडाखांचे जोरदार स्वागत केले.पाथर्डी येथे गोरे मंगल कार्यालयात शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत घेतलेल्या निर्णयाची आणि केलेल्या कामाची माहिती ना.गडाख यांनी यावेळी दिली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनिल पालवे म्हणाले आता शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे शिवसेना घरोघरी पोहोचेल.शेवगाव तालुका प्रमुख अँड अविनाश मगरे म्हणाले की आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणूका शिवसेना स्वबळावर लढवून स्थानिक स्वराज्य संस्थावर शिवसेनेचा झेंडा फडकवून शिवसेना घराघरात पोहोचवू.यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, शिवसेना जिल्हा महिला आघाडीच्या संघटक मंगलताई म्हस्के,शिवसेनेचे पाथर्डी तालुका प्रमुख अंकुशराव चितळे,उपप्रमुख नवनाथ वाघ, संघटक राजेंद्र म्हस्के,विष्णुपंत पवार, नवनाथ चव्हाण, सागर राठोड, भगवान दराडे,शिवकन्या कचरे,अँड अरुण बनकर, महादेव कुटे,विजय पाटील,सिद्धार्थ काटे,रामदास गोल्हार, वाघोली चे मा.सरपंच बाळासाहेब जमधडे,योगेश गायकवाड,यांच्या सह शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील अनेक मांन्यवर उपस्थित होते.सुत्रसंचालन सुखदेव मर्दाने यांनी तर आभार अविनाश मगरे यांनी मानले. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button