Maharashtra

Weather: पुढील चार पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस.. ह्या जिल्ह्यांना येलो तर यांना ऑरेंज अलर्ट…

Weather: पुढील चार पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस.. ह्या जिल्ह्यांना येलो तर यांना ऑरेंज अलर्ट…

मान्सून (Monsoon) सक्रिय झाल्याने राज्यात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसांची (Heavy Rain) शक्यता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवली आहे. कोकणातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. 12 सप्टेंबरपासून मुंबई (Mumbai), ठाण्यासह (Thane) कोकण (Konkan) भागात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. घाट भागातही मुसळधार पाऊस पडू शकतो. (Rain in Maharashtra)

संपूर्ण राज्यात ’यलो अलर्ट’

राज्यातील बहुतांश भागात पावसाचा येलो (Yellow Alert) आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली. तसेच पुणे (Pune), नाशिक (Nashik), अहमदनगर (Ahmednagar) या भागातही पावसाचा कहर सुरू आहे. आजही हवामान विभागाकडून (IMD) राज्यात पावासाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने संपूर्ण राज्यात पावसाचा ’यलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button