Maharashtra

Weather Alert: येते 48 तास धोक्याचे..! वादळी वाऱ्यासह काही जिल्ह्यात 3 ते 4 तासात गारपीट..!

Weather Alert: येते 48 तास धोक्याचे..! वादळी वाऱ्यासह काही जिल्ह्यात 3 ते 4 तासात गारपीट..! काही जिल्ह्यांना येलो अलर्ट…
राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अशात आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्याला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे असून आज हलके गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा, वाशिम, येवतमाळ, अमरावती, अकोला, एनजीपी आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये ३०-४० किमी प्रतितास पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर अकोल्यातही काही ठिकाणी गारपिटीने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्याकडून पुढचे २४ तास मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण आणि गोवा आणि पुढे पश्चिम किनारपट्टी, उत्तर कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील काही भागांवर मेघगर्जनेच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज पश्चिम विदर्भात गारपीटची शक्यता वर्तवण्यात आली असून काही शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान राज्यात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

आज, उद्या ७ व ८ एप्रिलला विदर्भातील सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरुपात (विजा आणि) गडगडाटासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. आज पश्चिम विदर्भात पावसाचा जोर राहिल तर उद्या पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण जास्त राहिल अशी शक्यता हवामान शास्त्रध्य प्रा. अनिल बंड यांनी व्यक्त केली आहे. तसेच आज यवतमाळ, वाशिम, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button