World

Viral Katta: आणि बुर्ज खलिफावर झळकला नाही पाकिस्तानचा झेंडा… पाकिस्तानी जमले चौकात पण दुबई ने दाखवली औकात.. पहा व्हिडिओ…

Viral Katta: आणि बुर्ज खलिफावर झळकला नाही पाकिस्तानचा झेंडा… पाकिस्तानी जमले चौकात पण दुबई ने दाखवली औकात..

आज १४ ऑगस्ट, पाकिस्तान स्वतंत्र झाला होता. दुसऱ्याच दिवशी भारत देश स्वतंत्र झाला होता. आज ७५ वर्षांनी जेव्हा दोन्ही देश मागे वळून पाहतात तेव्हा जगातील महासत्ता बनण्याच्या स्वप्नाकडे एक देश वाटचाल करत आहे.तर दुसरा कंगाल, दहशतवादाने पोखरून गेल्याचे दिसत आहे. आज पाकिस्तान ची औकात त्यांना दुबई च्या बुर्ज खलिफाने दाखवून दिली आहे.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बुर्ज खलिफावर गेल्या वर्षी १५ ऑगस्टला भारताचा तिरंगा झळकविण्यात आला होता. जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या या बुर्ज खलिफावर तिंरग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली होती. याचा पाकिस्तानला हेवा वाटत होता. गेल्या काही काळापासून दुबईतील पाकिस्तानी लोकांनी प्रशासनाकडे तशी मागणी केली होती.

१४ ऑगस्टच्या पूर्वसंध्येपासून पाकिस्तानी लोक बुर्ज खलिफाच्या परिसरात जमू लागले होते. पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत होते. मध्यरात्री १२ वाजता गर्दी वाढली होती. पाकिस्तानींनी काऊंटडाऊन सुरु केले, पण रात्री १२ वाजता बुर्ज खलिफावरील लाईट लागल्याच नाहीत. पाकिस्तानचा हिरवा झेंडा झळकलाच नाही… या बेईज्जतीच्या घटनेचा व्हिडीओ खुद्द पाकिस्तानींनी शेअर केला आहे.

बुर्ज खलिफा दुबईमध्ये आहे ज्याला जगातील सर्वात उंच इमारतीचा मान मिळाला आहे. येथे 2716.5 फूट उंचीवरून पाकिस्तानचा अपमान करण्यात आला आहे. पाकिस्तान 14 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या उत्सवाच्या निमित्ताने बुर्ज खलिफाकडून इमारतीवर पाकिस्तानचा ध्वज लावण्यास स्पष्ट नकार देण्यात आला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक पाकिस्तानचे नाव घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे जोक करत आहेत.

बुर्ज खलिफावर पाकिस्तानी झेंडा न झळकल्याने पाकिस्तानी नागरिक प्रचंड संतापले होते. देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी सर्व लोक शेकडोंच्या संख्येने मध्यरात्रीच बुर्ज खलिफा येथे पोहोचले होते. ही वास्तू आपल्या राष्ट्रध्वजाच्या रंगांनी उजळून निघेल या आशेने ते पाहत होते. ”12.01 मिनिटे झाली तरी पाकिस्तानी झेंडा झळकला नाहीय, हीच का आपली औकात”, असा शब्दांत तरुणी नाराजी व्यक्त करताना दिसत आहे.

Viral Katta: आणि बुर्ज खलिफावर झळकला नाही पाकिस्तानचा झेंडा... पाकिस्तानी जमले चौकात पण दुबई ने दाखवली औकात.. पहा व्हिडिओ...

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button