World

Space Wonder: अंतराळवीरांना अवकाशातून परत आल्यावर थेट रुग्णालयात का दाखल करतात..?

Space Wonder: अंतराळवीरांना अवकाशातून परत आल्यावर थेट रुग्णालयात का दाखल करतात..? नुकतेच चार अंतराळवीर परतले आहेत…

नासाचे चार अंतराळवीर (Astronaut) सहा महिन्यांच्या यशस्वी अंतराळ मोहिमेनंतर सोमवारी पृथ्वीवर (Earth) परतले आहेत.

एका विशिष्ट वातावरणात राहिल्यामुळे त्यांच्या मानसिक स्वास्थ्या वर देखील परिणाम होतो. एकूणच शारिरीक, मानसिकरीत्या पुन्हा सक्षम करण्यासाठी अंतराळवीरांवर रुग्णालयात उपचार केले जातात.
पृथ्वीवर परत आल्यावर अंतराळवीर नीट उभे देखील राहू शकत नाहीत. उभे राहिल्यावर त्यांचा तोल जातो. कित्येत दिलस ते चालू शकत नाहीत.अंतराळात अंतराळवीर हवेत तरंगत असतात यामुळे त्यांच्या स्नायूंची शक्तीही कमी होते.

अंतराळात वजन जाणवत नाही. पण पृथ्वीवर परत आल्यानंतर या अंतराळवीरांना अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. पृथ्वीवर परतलेल्या चारही अंतराळवीरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर विविध उपचार सुरु आहेत.
स्टीफन बोवेन आणि वॉरेन ‘वुडी’ होबर्ग, रशियाचे आंद्रेई फेदयेव आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) चे सुल्तान अल-नेयादी हे चार अंतराळवीरांनी यशस्वी अंतराळ मोहिमेनंतर पृथ्वीवर लँडिंग केले आहे.
स्पेसएक्स कॅप्सूलच्या (SpaceX Capsule) मदतीने फ्लोरिडाच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर अटलांटिक समुद्रामध्ये पॅराशूटच्या साहाय्यान या अंतराळवीरांना पृथ्वीवर उतरवण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button