India

वडाफोन -आयडिया VI बंद पडण्याच्या मार्गावर…!ग्राहकांना बसेल मोठा फटका..!

वडाफोन -आयडिया VI बंद पडण्याच्या मार्गावर…!ग्राहकांना बसेल मोठा फटका..!

भारतात नुकतेच वडाफोन व आयडिया या दोन मोठ्या कंपन्यांनी टाय अप करत VI नावाची नवीन फ्रॅंचायजी सुरू केली होती. भारतात टेलिकॉम कंपन्या वोडाफोन-आयडिया, एअरटेल आणि रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. मात्र, गेल्या काही वर्षात जिओच्या आगमनानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांना मोठे नुकसान होत आहे.एकेकाळी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेली वोडाफोन-आयडिया आज देशात तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र, गेल्या काही महिन्यात कंपनीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. Telecom Regulatory Authority of India (TRAI) च्या आकडेवारीनुसार जून २०२१ मध्ये वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. ग्राहकांची संख्या कमी झाल्याने कंपनीला मोठा आर्थिक तोटा झाला आहे. कंपनी दिवाळखोरीत जाण्याची शक्यता असल्याने ग्राहकांना देखील याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे रिचार्ज प्लान्स देखील महागण्याची शक्यता आहे. वोडाफोन-आयडियाच्या अपयशामुळे भारतातील ग्राहकांना देखील मोठा फटका बसणार आहे.

जिओ, एअरटेलच्या नेटवर्कवर पडेल ताण
वोडाफोन आयडिया दिवाळखोरीत गेल्यास ग्राहकांमध्ये देखील भिती पसरू शकते. अशा स्थितीमध्ये वीआयचे ग्राहक रिलायन्स जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल/एमटीएनएलकडे वळण्याची शक्यता आहे. मात्र, अचानक लाखो ग्राहकांचा ओघाने नेटवर्क कॅपिसिटीसंदर्भात समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधांवर नक्कीच परिणाम होईल. एकाच वेळी असंख्य नवीन ग्राहक जोडले गेल्याने सध्या मिळणाऱ्या ग्राहकांच्या सेवांवर देखील परिणाम पाहायला मिळेल. ग्राहकांकडे केवळ दोनच कंपन्यांचा पर्याय असेल.
वोडाफोन आयडिया बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने भारतीय टेलिकॉम बाजारात केवळ रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या दोनच मोठ्या कंपन्या राहतील. यामुळे केवळ या दोन कंपन्यांची मक्तेदारीच असेल. यामुळे ग्राहकांसमोर केवळ दोनच कंपन्याचा पर्याय असेल, जी चांगली गोष्ट नाही.

सेवांवर होईल परिणाम

वोडाफोन आयडिया बंद पडल्यास टेलिकॉम इंफ्रास्ट्रक्चरसाठी येणारा खर्च एअरटेल आणि जिओ या कंपन्यावर पडेल. यामुळे दोन्ही कंपन्यांच्या ऑपरेशन्सचा खर्च देखील वाढेल व टेक्नोलॉजीमधील गुंतवणुकीवर देखील परिणाम होईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button