Maharashtra

बोदवड तालुक्यातील साळशिंगी येथील ३५ वर्षीय बेपत्ता तरुणाचा विहरीत आढळला मृतदेह

बोदवड तालुक्यातील साळशिंगी येथील ३५ वर्षीय बेपत्ता तरुणाचा विहरीत आढळला मृतदेह

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

साळशिंगी ता. बोदवड येथील बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा तिसर्‍या दिवशी विहिरीत मृतदेह आढळला आहे. उमेश प्रल्हाद चौधरी ( 35) असे मयताचे नाव आहे. 6 रोजी चौधरी हे घरात कोणालाही न सांगता घरातून सकाळी सहा वाजता बाहेर गेले होते व परिसरात त्यांचा शोध सुरु होता. बुधवारी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास साळशिंगी शेती शिवारात जलचक्र रस्त्यावरील कालबैले यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत व्यक्तीचा मृतदेह आढळला. चौधरी यांनी आत्महत्या केल्याचा संशय असून या प्रकरणी मयताचे काका दिगंबर रामभाऊ चौधरी यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार निकम करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button