Mumbai

?️ Big Breaking…गावाला जाताय? या आहेत गाड्या ज्या 1 जून पासून संपूर्ण देशात सुरू झाल्या…

?️ Big Breaking…गावाला जाताय? या आहेत गाड्या ज्या 1 जून पासून संपूर्ण देशात सुरू झाल्या…

महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांनी चर्चा केल्यानंतर महाराष्ट्रातून देशभरात जाणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांचं वेळापत्रक निश्चित केलं.

1 जून म्हणजे काल पासून महाराष्ट्रातून देशभरात आणि देशभरातून महाराष्ट्रात 24 विशेष गाड्या सुरू होत असल्याचं पश्चिम रेल्वेनं स्पष्ट केलं.

या विशेष गाड्यांमधली पहिली ट्रेन मुंबईहून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसाठी 1 जूनच्या पहाटे सुटली. रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत प्रवाशांना गाडीमध्ये प्रवेश दिला गेला. मुख्य म्हणजे या गाड्या जिथून सुटल्या आहेत, त्याच ठिकाणी पुन्हा येणार आहेत. त्यामुळे ट्रेन पोहोचणाऱ्या दोन्ही शहरांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.

1 जूनपासून या विशेष रेल्वे गाड्या सुरू झाल्याचं रेल्वे मंत्रालयाने ट्वीट करूनही जाहीर केलं आहे. या ट्वीटनुसार, देशातली पहिली विशेष रेल्वे ही महानगरी एक्सप्रेस असून ती मुंबई सीएसएमटी ते वाराणसीपर्यंत धावत आहे.

सध्याच्या लॉकडाऊन – 5 दरम्यान महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून जाणाऱ्या या गाड्यांची यादी आणि त्यांच्या वेळेची माहिती स्थानिक जिल्हा प्रशासनाला द्यावी, अशी विनंती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी पत्राद्वारे महाराष्ट्राचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना केली.

लॉकडाऊन आणि कोरोनाच्या या संकट काळात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पाळण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन केले जावे अशी विनंतीही यादव यांनी पत्रामध्ये केली आहे.

?? नियम

या गाड्यांसाठी केवळ IRCTC च्या मोबाईल अॅपवरून किंवा वेबसाईटवरून ऑनलाईन बुकींग करता येणार आहे.

रेल्वे स्थानकांवर रांगा लावून तिकीट आरक्षित करता येणार नाही.

एखाद्या तिकिटाचं आगाऊ बुकिंग केवळ 30 दिवस आधीच करता येणार आहे.

तिकिटाचं आरक्षण झालेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये प्रवेश मिळेल. या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्यांना प्रवेश मिळणार नाही.

1 जूनपासून महाराष्ट्रातून देशभरात जाणाऱ्या एक्स्प्रेस

  • मुंबई सीएसएमटी ते भुवनेश्वर – कोणार्क एक्स्प्रेस
  • लोकमान्य टिळक (ट.) ते दरभंगा – दरभंगा एक्स्प्रेस
  • लोकमान्य टिळक (ट.) ते वाराणसी – कामायनी एक्स्प्रेस
  • मुंबई सीएसएमटी ते वाराणसी – महानगरी एक्स्प्रेस
  • मुंबई सीएसएमटी ते गडग – एक्स्प्रेस
  • मुंबई सीएसएमटी ते बंगळुरू – उद्यान एक्स्प्रेस
  • बांद्रा टर्मिनस ते जोधपूर – सूर्यनगरी एक्स्प्रेस
  • मुंबई सीएसएमटी ते हैदराबाद – हुसेन सागर एक्स्प्रेस
  • एच. एस. नांदेड ते अमृतसर – सचखंड एक्स्प्रेस
  • मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद – आश्रम एक्स्प्रेस
  • मुंबई एलटीटी ते थिरुअनंतपुरम सेंट्रल च नेत्रावती एक्स्प्रेसमुंबई सेंट्रल ते जयपूर – एक्स्प्रेस
  • लोकमान्य टिळक ते पाटलीपुत्र – एक्स्प्रेस
  • बांद्रा टर्मिनस ते गाझीपूर – एक्स्प्रेस
  • पुणे ते दानापूर – एक्स्प्रेस

लोकमान्य टिळक ते गुवाहाटी – एक्स्प्र

  • बांद्रा टर्मिनस ते गोरखपूर – अवध एक्स्प्रेस
  • बांद्रा टर्मिनस ते मुझफ्फरपूर – अवध एक्स्प्रेस

1 जूनपासून महाराष्ट्रात देशभरातून येणाऱ्या एक्स्प्रेस

  • गोरखपूर ते लोकमान्य टिळक (ट.) – कुशीनगर एक्स्प्रेस
  • लखनऊ जंक्शन ते मुंबई सीएसएमटी – पुष्पक एक्स्प्रेस
  • हावडा ते मुंबई सीएसएमटी – हावडा मेल
  • अमृतसर ते मुंबई सेंट्रल – गोल्डन टेंपल मेल
  • अमृतसर ते बांद्र टर्मिनस – पश्चिम एक्स्प्रेस
  • पटना ते लोकमान्य टिळक – एक्स्प्रेस
  • गोरखपूर ते लोकमान्य टिळक – एक्स्प्रेस

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button