Delhi

आप चे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे कार्यकर्त्यांना फटाके न फोडण्याचे  आवाहन!

आप चे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे कार्यकर्त्यांना फटाके न फोडण्याचे आवाहन!

दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकालाचे कल हाती आले आहेत. आजच्या निकालांमध्ये प्रमुख लढत ही भाजप व आपमध्ये असल्याचे दिसून आले.

सकाळपासूनच्या मतमोजणीनुसार अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 52 जागांवर आघाडी मिळवली. तर 18 जागांवर भाजपाने आघाडी घेतली.

बहुमतासाठी लागणारा 36 जागांचा आकडा आप सहज पार करील असे चित्र दिसत आहे. आप समर्थकांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.

*आवाहन* : अरविंद केजरीवाल यांनी विजयाचा जल्लोष साजरा करताना फटाके न फोडण्याचे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. फटके फोडल्याने प्रदुषण होते त्यामुळेच फटाके फोडणे टाळावे असे केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

कालपासूनच दिल्लीमधील आपच्या कार्यालयामध्ये निवडणुकीच्या विजयाची तयारी सुरु झाली आहे. आयटीओ येथील आपच्या कार्यालयामध्ये संध्याकाळपासून मिठाईचे पुडे व इतर पदार्थ मागवले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button