Patur

आगामी सण-उत्सव शांततेत पार पाडा ….अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत

आगामी सण-उत्सव शांततेत पार पाडा ….अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत

पातुर तालुका प्रतिनिधी:विलास धोंगडे

पातूर पोलिस स्टेशनच्या वतीने पंचायत समितीच्या सभागृहांमध्ये आगामी नवदुर्गा उत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन ,
इदमिलादुंन्नबी ,रावण दहन ,दसरा उत्सव निमित्त शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत होत्या
तर तहसीलदार दीपक बाजड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन सिंह बायस ठाकूर ,ग्रामसेवक गाडगे यांची मंचावर उपस्थित होती
यावेळी आगामी सण उत्सवाचे नियम आणि अटी पालन करून सण उत्सव कसे साजरे करायचे याविषयी प्रास्ताविक ठाणेदार गजानन सिंह ठाकुर बायस यांनी व्यक्त केले तर
कोरोनाचा पादुर्भाव पाहता पाचपेक्षा जास्त गर्दी करता येणार नाही उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावे धम्मचक्र प्रवर्तन दिन , धम्म वंदना सुद्धा घरच्या घरी करायची आहे ,रावण दहन सुद्धा नियमाचे पालन करून करायचे आहे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक यांनी करून त्यांना कायद्याच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्या बोलल्या
पातूर पंचायत समितीमध्ये आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या त्यांनी पुढे बोलताना म्हटले की कोरोणाचा प्रादुर्भाव असल्याने जान है तो जहाँ आहे म्हणून प्रथम माणूस वाचला पाहिजे याकरिता उजळणी व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे म्हणून येणारे सण आणि उत्सव शांततेत पार पाडावे असे आवाहन त्यांनी बोलताना केले याप्रसंगी शांतता समिती या सभेमध्ये काही नागरिकांकडून सूचना मागविल्या होत्या यामध्ये बळीराम खंडारे, नारायण अंधारे, अंबादास देवकर सचिन वारोकार,, निर्भय पोहरे ,यांनी सूचना मांडल्या या सूचनेचे निराकरण करणार याचा प्रयत्न करणार असल्याचे व्यासपीठावर अधिकाऱ्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस कर्मचारी निलेश गाडगे यांनी केले तसेच सदर कार्यक्रम शांततेत पार पाडण्यात आला यावेळी शांतता समितीच्या सभेला शांतता समितीचे सदस्य गणमान्य प्रतिष्ठित पत्रकार मंडळी तसेच दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य आणि इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button