Solapur

जि. प. प्रा शाळा गेंडवस्ती (तु.) येथे वृक्षारोपण एक पद- एक वृक्ष उपक्रमांतर्गत

जि. प. प्रा शाळा गेंडवस्ती (तु.) येथे वृक्षारोपण
एक पद- एक वृक्ष उपक्रमांतर्गत

सोलापूर : दि.२८. आज दि.जि. प. प्रा. शाळा गेंडवस्ती (तु.) ता ‌ माढा येथे मा. दिलीप स्वामी साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांचे मार्गदर्शना अंतर्गत एक पद- एक वृक्ष या कार्यक्रमांतर्गत शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. अरण केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. विलास काळे यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण केले. वड, पिंपळ, उंबर अशा प्रकारच्या झाडासह विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. यावेळी शिक्षणप्रेमी जेष्ठ नागरिक संदीपान ढेरे गुरुजी, शेतकरी संघटनेचे नेते अभिमान दगडे, संजय तांबिले, हनुमंत ढेरे उपस्थित होते. शालेय वृक्षारोपण यशस्वी करण्यासाठी गेंडवस्ती शाळेतील शिक्षक प्राथमिक शिक्षक भारती चे राज्याध्यक्ष श्री. नवनाथ गेंड व श्री. तुकाराम नेटके यांनी परिश्रम घेतले. शालेय परिसर स्वच्छता, वृक्षारोपण, ऑनलाईन अध्ययन अद्यापन उपक्रम पाहून केंद्रप्रमुख डॉ.विलास काळे यांनी कौतुक केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button