Indapur

इंदापूर तालुक्यातील दोन डॉक्टरांना पाठवले सक्तीच्या रजेवर . बहुजन मुक्ती पार्टीच्या आंदोलनाला यश.

इंदापूर तालुक्यातील दोन डॉक्टरांना पाठवले सक्तीच्या रजेवर . बहुजन मुक्ती पार्टीच्या आंदोलनाला यश.

पुणे दत्ता पारेकर

पुणे- इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील सेंटरमध्ये उपचारादरम्यान वापरण्यात येणाऱ्या फँबी फ्ल्यू गोळ्यांवर डल्ला मारण्याचे प्रकरण सबंधित डाॅक्टर च्या चांगलेच अंगलोट आले असून पुणे जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा रुग्णालय,पुणे यांनी या प्रकरणी चौकशीचे अहवाल प्राप्त होईपर्यंत या दोन डॉक्टरांचे तातडीने निलंबन केले आहे.

निमगाव केतकी येथील कोवीड केअर
सेंटरमधून दि.०९ सप्टेंबर रोजी रुणांसाठी अत्यावश्यक व दुर्मिळ औषधे (फँबी फ्ल्यू) गोळ्यांचा काही साठा लंपास झाला मात्र प्रशासकीय अधिकारी प्रतिष्ठीत डॉक्टर यांनी हे प्रकरण संगनमताने दाबून टाकले असल्याने सबंधित दोषींवर कारवाई व्हाई यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे इंदापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग यांसह इतर कार्यकर्त्यांनी दि.21 आँक्टोंबर पासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण पुकारले होते.त्यानंतर दि.23 आँक्टोंबर रोजी बहुजन मुक्ती पार्टीचे महासचिव अँड.राहुल मखरे यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी इंदापूर पोलीस स्टेशन येथे जाऊन निमगांव केतकी येथील कोवीड केअर सेंटर मध्ये झालेल्या पाच व्यक्तींच्या मृत्यूस सबंधित अधिकारी जबाबदार आहेत.त्यांनी रुणांसाठी अत्यावश्यक व दुर्मिळ औषधे (फँबी फ्ल्यू) गोळ्यांचा काही साठा लंपास करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणत शेकडो कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यातचं ठिया मांडला. जर कारवाई करणार नसाल तर आम्ही स्वत: जेलभरो आंदोलन करत स्वत:हून अटक होतो हा पवित्रा घेतला.
या सर्व प्रकारानंतर आरोग्य प्रशासनाने तातडीने पावले उचलत जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय,पुणे यांच्याशी भ्रणध्वनीवरुन संपर्क साधून वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेनुसार या कामी चौकशी समिती नेमण्यात आली असून सदर समितीचा चौकशी अहवाल येईपर्यंत प्रभारी वैद्यकिय अधिक्षक डॉ.मिलिंद खाडे व आरबीएसके वैद्यकिय अधिकारी डाँ.सुहास डोंगरे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button